Heart Attack: पर्यटनासाठी गेलेल्या 36 वर्षीय ब्युटिशिअनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, महिलांनी 30 शी नंतर 'या' चाचण्या कराव्या

Farah El Kadhi: ट्युनिशियन ब्युटी इनफ्लुएंसर फराह एल कादी हिचे वयाच्या ३६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
Farah El Kadhi:
Farah El Kadhi: Sakal
Updated on

Farah El Kadhi: सोशल मिडिया हे एक असे व्यासपीठ बनवले आहे ज्यामुळे अनेकांना नवीन ओळख मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक देशात आणि जगात आपला ठसा उमटवत आहेत. मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या ब्युटी इनफ्लुएंसर फराह एल कादी हिचे वयाच्या ३६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ती माल्टामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आली होती. तिच्या आकस्मिक निधनाने तिचे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

फराहच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हृदयविकाराचा झटका तिच्या मृत्यूचे कारण असल्याचे मानले जात आहे. वयाच्या 36 व्या वर्षी महिलांना हृदयविकाराचा झटका येणे नक्कीच असामान्य आहे, परंतु अशक्य नाही. आजच्या धावपळीच्या जीवनामुळे आणि धकाधकीच्या वातावरणामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत चालला आहे. अशावेळी महिलांनी वयाची 30 ओलांडल्यानंतर त्यांच्या आरोग्यासंबंधित कोणत्या चाचण्या कराव्या हे जाणून घेऊया.

महिलांनी पुढील चाचण्या कराव्या

लिपिड प्रोफाइल चाचणी

ही चाचणी रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी मोजते. उच्च कोलेस्टेरॉल हा हृदयविकाराचा एक प्रमुख जोखीम घटक आहे.

इसीजी

ही चाचणी हृदयाच्या विद्युत क्रियाकलापांची नोंद करते आणि हृदयातील कोणत्याही विकृती शोधू शकते.

इकोकार्डियोग्राम

ही चाचणी हृदयाची रचना आणि कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी ध्वनी लहरींचा वापर करते.

स्ट्रेस टेस्ट

या टेस्टमध्ये व्यायाम किंवा औषधांद्वारे हृदयावर ताण टाकला जातो आणि हृदय हा ताण कसा सहन करतो हे पाहिलं जातं.

या चाचण्यांव्यतिरिक्त, हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, धुम्रपान न करणे आणि तणावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com