Fatty Liver : व्यस्त जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे फॅटी लिव्हर. लिव्हर पेशींमध्ये अनावश्यक चरबी साचल्याने ही परिस्थिती उद्भवते. यामुळे फॅटी लिव्हरचा धोका संभवतो.
योग्य वेळी आपल्या यकृतातील वाढत्या चरबीकडे लक्ष दिले नाही, तर गंभीर परिणाम होतात. शक्य तितक्या लवकर उपचार केल्यास निरोगी आयुष्य जगता येते.
पोटाच्या आजारांमध्ये फॅटी लिव्हर ही एक मोठी समस्या बनत आहे. आता लोक कमी वयात या आजाराला बळी पडत आहेत. या यकृताच्या आजारामुळे यकृत निकामी होण्याचा धोका असतो. फॅटी लिव्हरची काही लक्षणेही सुरुवातीला दिसतात, परंतु लोक त्याकडे लक्ष देत नाहीत आणि नंतर ही समस्या गंभीर स्वरूप धारण करते. (Fatty Liver)
सुनार इंटरनॅशनल हॉस्पिटल्समधील यकृत प्रत्यारोपण विभागातील एचओडी, एचपीबी सर्जरी डॉ. अंकुर गर्ग म्हणाले की, फॅटी लिव्हर ही समस्या झपाट्याने वाढत आहे. फॅटी लिव्हरमुळे यकृत प्रत्यारोपणाची प्रकरणेही वाढत आहेत. सध्या १५ ते २० टक्के प्रकरणांमध्ये यकृत प्रत्यारोपणाचे कारण फॅटी लिव्हर आहे.(Fatty Liver : If you want to avoid fatty liver, then start these five things from today, you will never be a victim of this disease)
पूर्वी हा आकडा फक्त 5 टक्क्यांपर्यंत असायचा. याआधी हा आजार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये आढळत होता, मात्र आता 30 वर्षांचे लोकही या आजाराला बळी पडत आहेत.(Fatty Liver Symptoms)
हा आजार का वाढत आहे
खाण्याच्या चुकीच्या सवयी हे फॅटी लिव्हरचे आजार वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. याशिवाय वाढता लठ्ठपणा आणि दारूचे सेवन हे देखील या आजाराच्या प्रसाराचे कारण आहे, मात्र आता जे लोक दारूचे सेवन करत नाहीत ते देखील या आजाराला बळी पडत आहेत.
पोटदुखीला हलक्यात घेऊ नका
डॉ. अंकुर स्पष्ट करतात की फॅटी लिव्हरचे प्रारंभिक लक्षण म्हणजे पोटदुखी. पण बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की पोटात सतत दुखणे ही किरकोळ समस्या असेलच असे नाही तर ते फॅटी लिव्हरचेही लक्षण आहे. ही समस्या सतत होत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
फॅटी लिव्हरची लक्षणे
पोटाचा घेर वाढणे
वजन सतत वाढणे
यकृताचा आकार वाढणे व सूज येण
मळमळणे
भूक न लागणे
कामात उत्साह न राहणे
पायांना सूज येणे
थकवा
पोटात उजव्या बाजूला दुखणे
लिव्हरला फॅटी बनवायचे नसेल तर काय करावे
1. आहारात जास्त चरबीयुक्त पदार्थ खाऊ नका
2. तुमच्या आहारात फायबरचा समावेश करा
3. दररोज व्यायाम करा
4. मैदा, साखर आणि मीठ यांचे जास्त सेवन टाळा
5. वजन नियंत्रणात ठेवा.
दारूमुळे होतो गंभीर आजार
फॅटी यकृत या आजाराचे प्रमाण हल्ली फारच वाढले आहे. बहुतांश व्यक्तीमध्ये ग्रेड वन चरबीचे प्रमाण अधिक असू शकते. दारू न पिणाऱ्या वा कमी पिणाऱ्या व्यक्तींच्या यकृतात चरबीचे प्रमाण वाढले, तर या आजाराचे निदान केले जाते. चरबीचे प्रमाण जास्त असल्यास यकृतास सूज येते, पुढे जखमा, घट्टपणा येतो. त्यामुळे पुढे सिरोसिस वा कॅन्सरचीही भीती असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.