Fertility In Women : निरोगी राहण्यासाठी हेल्दी डाएट प्लान फॉलो करावा असा सल्ला कायम तज्ज्ञ देत असतात. हल्ली महिलांमध्ये प्रजनन क्षमता कमी झाल्याने गर्भधारणेत समस्या येणे ही बाब सामान्य झाली आहे. यामागचे सगळ्यात मोठे आणि महत्वाचे कारण सांगायचे झाल्यास दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयी. जसे की जंक फूट किवा प्रोसेस्ड फूडचे सेवन मोठ्या प्रमाणात करणे. शिवाय फिजीकल अॅक्टिव्हिटीजही कमी करतात. ज्यामुळे वजन वाढणे, मधुमेह, पीसीओस यांसारख्या आजारांना त्या बळी पडतात.
तेव्हा तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत तुम्ही सुधार केल्यास या सगळ्या समस्यांपासून स्वत:चा बचाव करू शकता. न्यूट्रिशनिस्ट जुही कपूर यांच्याकडून आपण प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी कोणती पोषक तत्व महत्वाची आहे ते जाणून घेऊयात.
१) फोलेट - हेल्दी ओव्ह्यूलेशनसाठी पालेभाज्या, बीन्स आणि फोर्टिफाइट अन्नधान्याचे सेवन करा.
२) लोह - अॅनिमियापासून बचाव करण्यासाठी लीन मीट, बीन्स आणि पालक यांचा आहारात समावेश करून घ्या.
३) ओमेगा -३ फॅटी अॅसिड - हार्मोन संतुलनासाठी आणि अंडाशयाची गुणवत्त वाढवण्यासाठी फॅटी फिश, जवस आणि अक्रोडचे सेवन करा. (Lifestyle)
४) अँटीऑक्सिडंट्स - अंडाशय डॅमेज होण्यापासून रोकण्यासाठी जांभूळ, आंबट फळे आणि नट्सचे सेवन करा.
५) प्रोटीन - हार्मोन्सच्या उत्पादनासाठी पोल्ट्री, टोफू, बीन्स यांसारख्या पदार्थांचा समावेश करून घ्या.
६) कॅल्शियम - कॅल्शियन मिळवण्यासाठी दूध प्यावे. (Health)
7) झिंक - हार्मोन संतुलनासाठी कडधान्ये, नट्स आणि बियांमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते.
८) व्हिटॅमिन सी आणि ई - ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी फळे, भाज्या आणि नट्सचे सेवन करा.
९) फायबर - ब्लड शुगर आणि हार्मोनल संतुलनासाठी कडधान्ये, फळे आणि भाज्यांचे सेवन करा.
१०) हायड्रेशन - निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.