Cancer Free : स्वदेशी CAR-T सेल थेरपीमुळे कर्करोगमुक्त झाला भारतातील पहिला रूग्ण, उपचारांचा खर्च ४ कोटींवरून आला ४० लाखांवर

डॉ. गुप्ता यांची टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आता डॉ. गुप्ता कॅन्सरमुक्त झाले आहेत. CAR-T ही थेरपी घेतल्यानंतर कर्करोगाने मुक्त झालेले ते पहिले रूग्ण ठरले आहेत.
Cancer Free
Cancer Freeesakal
Updated on

Cancer Free : मागील काही महिन्यांपूर्वी आयआयटी बॉंम्बे आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांनी कॅन्सरवरील 'इम्युनोॲक्ट' ही विशेष प्रकारची उपचार थेरपी विकसित केली होती. या थेरपी पद्धतीनुसार भारतातील १५ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. नुकतेच ‘इंडियन एक्सप्रेसमध्ये’ या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वृत्तानुसार या १५ रूग्णांपैकी ३ जण कर्करोगातून मुक्त झाले आहेत.

या संदर्भात कॅन्सरमुक्त झालेले पहिले रूग्ण डॉ.व्ही.के. गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी खास संवाद साधला. भारतातील ‘सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने CAR-T सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरास काही महिन्यांपूर्वीच मान्यता दिली. या थेरपीनुसार कॅन्सरग्रस्त रूग्णाची रोगप्रतिकारक शक्ती जेनेटिकली री-प्रोग्रॅम केली जाते.

डॉ. गुप्ता यांची टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आता डॉ. गुप्ता कॅन्सरमुक्त झाले आहेत. CAR-T ही थेरपी घेतल्यानंतर कर्करोगाने मुक्त झालेले ते पहिले रूग्ण ठरले आहेत.

याबद्दल टाटा मेमोरिअल सेंटर आणि ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंटच्या हेमॅटो ऑनकोलॉजिस्टच्या मते ही थेरपी आयुष्यभर काम करेल की नाही, हे आताच सांगणे कठीण आहे. परंतु, सध्या गुप्ता यांच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशी मुक्त झाल्या आहेत.

Cancer Free
World Cancer Day 2024 : प्रोटाॅन बीम थेरपी म्हणजे काय? भारतात ही सुविधा कुठे उपलब्ध आहे?

काय आहे CAR-T  सेल थेरपी?

कायमेरिक अँटीजन रिसेप्टर-टी (CAR-T) या सेल थेरपीच्या माध्यमातून रक्तातील कर्करोगावर उपचार केला जातो. रक्तातील कर्करोगा व्यतिरिक्त या थेरपीच्या माध्यमातून लिम्फोसायटिक ल्यूकेमिया आणि बी-सेल लिंफोमा सारख्या गंभीर कर्करोगांवर उपचार केले जातात.

अँटिजन रिसेप्टर-टी सेल थेरपी हे उपचार पद्धतींमध्ये वापरले जाणारे एक प्रगत तंत्रज्ञान आहे. या थेरपीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने रूग्णाच्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींच्या टी-सेल्स काढून टाकल्या जातात. त्यानंतर, टी सेल्स आणि पांढऱ्या रक्त पेशी वेगवेगळ्या प्रकारे शरीरात टोचल्या जातात. ही थेरपी पूर्ण झाल्यानंतर टी-पेशी कर्करोगाशी लढण्याचे काम करतात.

भारतात ही थेरपी कुठे आहे उपलब्ध ?

सध्या ही CAR-T थेरपी भारतातील १० शहरांमधील ३० रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. १५ वर्षांवरील रूग्ण या थेरपीद्वारे उपचार घेऊ शकतात. ही CAR-T  थेरपी NexCAR 19, ImmunoACT  यांनी विकसित केली आहे.

ही थेरपी IITB (आयआयटी बॉंम्बे हॉस्पिटल) हॉस्पिटल्समध्ये उलब्ध आहे. हे ल्युकेमिया आणि लिम्फोमा सारख्या बी-सेल कॅन्सरच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करते. ऑक्टोबर २०२३ मध्ये CDSCO ने त्याच्या व्यावसायिक वापरास मंजूरी दिली होती.

या उपचार पद्धतीसाठी खर्च किती येतो?

या थेरपीमुळे कॅन्सरमुक्त झालेले रूग्ण डॉ.व्ही.के.गुप्ता हे २८ वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत आहेत. तब्बल ४२ लाख रूपये खर्चून त्यांनी ही थेरपी घेतली. या थेरपीची परदेशात किंमत जवळपास ४ कोटी आहे. गुप्तांसह इतर अनेक रूग्णांसाठी ही थेरपी जीवनदायी ठरली आहे.

Cancer Free
Cervical Cancer : जगातला असा देश जिथे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे अधिक शिकार, दरवर्षी इतक्या महिला पडतात बळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.