Weight Loss Drink हे हेल्दी ड्रिंक प्या! शरीर डिटॉक्स होण्यासह वजनही घटेल, जाणून घ्या फायदे

शरीराचे वाढलेले वजन कमी करायचे आहे? तर आपल्या डाएटमध्ये या हेल्दी ज्युसचा समावेश नक्की करून पाहा.
Fig Anjeer weight loss drink
Fig Anjeer weight loss drinkSakal
Updated on

Weight Loss Drink Tips : कामाच्या धबडग्यात कित्येकांना आरोग्याची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. परिणामी वजन वाढणे, मांडी-पोट- कमरेच्या भागावर अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. ‘काम इतके आहे की वेळच मिळत नाही’ आपण देखील वेळेचे असेच कारण देत आहात का? मग लक्षात ठेवा मंडळींनो व्यायाम तसेच खाण्यापिण्याच्या वेळा पाळण्यासाठी स्वतःहून वेळ काढला नाही तर वेळ मिळणार नाहीच. 

Fig Anjeer weight loss drink
आहार‘मूल्य’ : सणासुदीचा काळ आणि आहार

आरोग्य निरोगी ठेवायचे असेल, वजन कमी करायचे असेल तर आजपासून फिटनेससाठी वेळ काढायला सुरुवात करा. व्यायामसह डाएटमध्ये काही हेल्दी पेयांचाही समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी अंजीरचे पाणी प्यायल्यास आरोग्यास बरेच फायदे मिळू शकतील. 

Fig Anjeer weight loss drink
अंड्यासह कधीही खाऊ नका हे खाद्यपदार्थ, आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम

कारण हा एक हेल्दी पर्याय आहे. अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पोट भरलेले राहते व वारंवार भूक लागण्याची समस्याही दूर होते. महत्त्वाचे म्हणजे शरीर देखील डिटॉक्स होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती…

वजन कमी होण्यास कशी मिळू शकते मदत?

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अंजीरच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीराचे वाढलेले वजन जलदगतीने कमी होण्यास मदत मिळू शकते. अंजीरमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. ज्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

तज्ज्ञमंडळींच्या माहितीनुसार अंजीरच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास पोट भरलेले राहते आणि भूक कमी लागते. यामुळे शरीर देखील डिटॉक्स होण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा हा हेल्दी पर्याय आहे. यामुळे शरीरास कोणतेही अपाय होणार नाहीत.

Fig Anjeer weight loss drink
Cozy Cardio फिटनेसप्रेमींमध्ये वेटलॉससाठी वाढतोय कोझी कार्डियोचा ट्रेंड, जाणून घ्या काय-काय आहेत फायदे

NOTE आहारामध्ये अंजीर ज्युसचा समावेश करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच अंजीरचे पाणी प्यावे.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.