Eye Flu: प्रवास करताना डोळ्यांचा फ्लू टाळण्यासाठी या सोप्या स्टेप्स करा फॉलो

आय फ्लू किंवा डोळ्यांचा संसर्ग कसा होतो आणि ते टाळण्यासाठी काय करायला पाहिजे हे जाणून घ्या.
Eye Flu
Eye Flusakal
Updated on

राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात आय फ्लूचा प्रसार झपाट्याने होत आहे. रुग्णालयातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डोळा येणे हे सामान्य असले तरी यावेळी मात्र याची अनेक प्रकरणे पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही गंभीर समस्या उद्भवू नये, यासाठी तज्ज्ञ सतत सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत. ऑफिस किंवा कॉलेजसाठी रोज प्रवास करणाऱ्यांना हा धोका जास्त असतो.

जर तुम्हीही दररोज पब्लिक ट्रांसपोर्ट वापरून ऑफिसला अप आणि डाऊन करत असाल, तर तुमच्यासाठी स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया काही टिप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही प्रवास करताना डोळ्यांच्या फ्लूपासून स्वतःचा बचाव करू शकता.

प्रवास करताना डोळे असे ठेवा सुरक्षित

1. मेट्रो किंवा बसने प्रवास करताना डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस घाला. याशिवाय तुम्ही सेफ्टी आयवेअर देखील घालू शकता. त्याच्या मदतीने, धूळ जंतू तुमच्या डोळ्यात जाणार नाहीत जे डोळ्याच्या फ्लूच्या विषाणूचे कारण बनू शकतात. डोळ्यांच्या संरक्षणासाठी फक्त रॅप-अराउंड सनग्लासेस वापरावेत हे लक्षात ठेवा. हे डोळ्यांना सर्व बाजूंनी संरक्षण देऊन फ्लूपासून संरक्षण करते.

Eye Flu
International Friendship Day 2023: जागतिक स्तरावर आज साजरा केला जातोय 'फ्रेंडशिप डे, जाणून घ्या काही खास गोष्टी

2. प्रवास करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. घाणेरड्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. हँड सॅनिटायझरची बाटली सोबत ठेवा. त्याचा सतत वापर करा. बस किंवा मेट्रोमधील स्टँड किंवा सीटला स्पर्श केल्यास फ्लूचा धोका जास्त असतो.

3. आय फ्लू टाळण्यासाठी, सोशल डिस्टन्सिंगचे नक्कीच पालन करा. तुम्ही मेट्रो स्टेशन किंवा बस स्टँडवर असाल तर गर्दीच्या ठिकाणी लोकांपासून अंतर ठेवा. असे केल्याने संसर्गाचा धोकाही कमी होतो.

Eye Flu
Women Hygiene : प्लास्टिक पॅडपेक्षा Organic सॅनिटरी पॅड अधिक सुरक्षित, जाणुन घ्या तज्ज्ञांकडून कारण

4. तुमचा मोबाईल फोन, बॅग यांसारख्या सर्व वस्तू नियमितपणे स्वच्छ करत रहा. हे विषाणू त्याच्यावर देखील बसू शकतात आणि जेव्हा तुम्ही त्यांना स्पर्श करता तेव्हा ते तुमच्या डोळ्यांपर्यंत सहज पोहोचू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.