Health Tips In Asthma : बदलत्या वातावरणात सर्दी खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात. अस्थमाच्या रूग्णांना याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अस्थमाच्या रूग्णांना त्यांच्या औषधांबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींकडेही लक्ष देण्याची विशेष गरज आहे. आज आपण अस्थमाच्या रूग्णांनी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे ते जाणून घेऊयात.
अस्थमाच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर फळांचा समावेश तुमच्या रोजच्या आहारात करून घ्या. संत्र्यामध्ये व्हिटामिन सी चे प्रमाण जास्त असते.
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की श्वसन नलिकेत येणारी सूज दूर करून आलं तुम्हाला रिलॅक्स करण्यास मदत करते. बदलत्या वातावरणात तुम्हाला आल्याचा चहासुद्दा पिऊ शकता. जेणेकरून तु्म्हाला अस्थमाचा त्रास होणार नाही.
हळद आणि आलं दोन्ही आरोग्यासाठी फार फायद्याचे आहेत. श्वसनाचे त्रास दूर करणय्यास हळदीची मदत होते.
पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पालकमध्ये भरपूर व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. पालकमध्ये फोलेट म्हणजेच व्हिटॅमन बी चे प्रमाण जास्त असते. अस्थमाच्या रूग्णांसाठी फोलेट फार महत्वाचे आहे. रिसर्चमध्ये असा खुलासा झालाय की ज्या मुलांमध्ये लहानपणापासूनच फोलेट आणि व्हिटामिन डी ची कमतरता असते त्यांना अस्थमा होण्याचा धोका वाढतो.
डाळींबामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. रिसर्चनुसार डाळींबाचा रस प्यायल्याने फुफ्फुसांमधील टिशू डॅमेजचा धोका कमी होतो. सोबतच डाळींब श्वसन नलिकेतील सूज कमी करून शरीराला न्यूट्रिशन पुरवते.
टोमॅटोच्या बिया सोडून संपूर्ण टोमॅटो शरीरासाठी फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडंट्स असण्याबरोबरच लो कॅलरी फळ आहे. जर तुम्ही टोमॅटोचा ज्यूस पित असाल तर श्वसनासंबंधित त्रास दूर होतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.