Food For Strong Bone : असं म्हणतात की जगताना माणसांचा समतोल राखावा. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात गोड बोलणारे अन् कडू बोलणारे दोघे असले की जगण सहज सोप्प होऊन जातं. अगदी त्याप्रमाणेच शरीराचे काम सुरळीत रहावं, आरोग्य उत्तम रहावं यासाठी शरीराला लागणाऱ्या छोट्यात छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
आपल्या जवळपास असलेल्या अनेक गोष्टी शरीरासाठी पुरक असतात. कोकणातील लोक तिकडची फळ, भाज्या खाऊन आरोग्य सांभाळतात. तर शहरातील लोक तीच फळ विकत घेऊन सुदृढ राहतात. कारण, निसर्गानेच मानवाला बनवलं त्यामुळे शरीर चांगल हवं असेल तर सगळ्या गोष्टींच योग्य प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे.
शरीराच्या गरजेबद्दल सांगायचं झालं तर, शरीराला अन्नातून मिळाणारे घटक महत्त्वाची भुमिका बजावतात. तसंच शरीरातील चयापचय आणि मज्जासंस्थेसाठी पोषक म्हणून तांबे आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, वारंवार आजार, कमकुवत-नाजूक हाडे, कमकुवत स्मरणशक्ती, चालण्यास असमर्थता, फिकट त्वचा, पांढरे केस, कमकुवत दृष्टी होऊ शकते.
तांबे हाडांसाठी आवश्यक
ऑस्टिओपोरोसिस हाडांसाठी धोकादायक आहे. यामुळे हाडे कमकुवत आणि नाजूक होतात. यामध्ये हाडे तुटून केवळ तीव्र धक्क्याने किंवा पडल्यामुळे चिरडली जाऊ शकतात. एनसीबीआईवर प्रकाशित झालेल्या संशोधनात तांब्याच्या कमतरतेमुळे या आजाराचा धोका जास्त असल्याचे दिसून आले आहे.
अंजीर खाण्याचे फायदे
ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी अंजीरचे सेवन करावे. तसं पाहिलं तर त्यात भरपूर पोषण असतं. पण त्यात तांब्याचे प्रमाण सर्वाधिक असते. आपण हे ड्राय फ्रूट म्हणून खाऊ शकता आणि स्मूदी किंवा डिशमध्ये देखील खाऊ शकता.
कसे खावे अंजीर
अंजीर भिजवून खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण, असे केल्याने ते पचविणे सोपे होते आणि विद्रव्य फायबर सक्रिय होते. पोट आणि पचनासाठीही हे खूप फायदेशीर ठरते.
बद्धकोष्ठतेचा खरा उपचार
भिजवलेल्या अंजीरातील फायबर बद्धकोष्ठता दूर करू शकते. रोज रिकाम्या पोटी खाल्ल्याने बद्धकोष्ठता काही दिवसात दूर होऊ शकते. अन्यथा, या समस्येमुळे मूळव्याध आणि फिशर सारख्या वेदनादायक समस्या उद्भवू शकतात.
रक्तातील चरबी कमी करते
काही संशोधनात अंजीरचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे आढळले आहे. कारण, हे रक्तातील चरबी कमी करण्यास मदत करते. याशिवाय याचे सेवन केल्याने बीपीही नियंत्रित होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.