Food For Weight Loss: वजन कमी करणाऱ्या 'या' ५ पदार्थांचे आहारात करा सेवन, चवीसोबतच पोषक घटकांनी आहेत समृद्ध

Food For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी पांढऱ्या तांदळाएवजी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.
Food For Weight Loss
Food For Weight LossSakal
Updated on

Food For Weight Loss: लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या अनेक लोकांमध्ये वाढत चालली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक भात खाणे टाळतात. कारण यात पोषक घटक पुरेशा प्रमाणात नसतात. याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. तसेच मधुमेहाचा धोका देखील वाढू शकतो. पण काही पदार्थ असे आहेत, ज्यांचा आहारात समावेश केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो आणि शरीराला मुबलक प्रमाणात पोषक घटक मिळतात. जर तुम्हालाही वजन की करायचे असेल तर पुढील पदार्थांचे सेवन करू शकता.

क्विनोआ

अनेक लोक फिटनेससाठी क्किनोआचा पर्याय निवडतात. क्विनोआच्या लहान बिया ग्लूटेन-मुक्त असतात आणि त्यात तांदूळपेक्षा जास्त प्रथिने असतात. मॅग्नेशियम युक्त क्विनोआ हा भाताला पोषक पर्याय असू शकतो.

ब्राऊन राईस

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसमध्ये जास्त फायबर, खजिने आणि जीवनसत्वे असतात. ब्राऊन राईसमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतात. पांढऱ्या तांदळाच्या एवजी ब्राऊन राईस खाणे आरोग्यदायी असते.

बार्ली आणि बाजरी

पुर्वी लोक गहू आणि तांदूळ एवजी बार्ली आणि बाजरी खातात. यामध्ये पांढऱ्या तांदळच्या तुलनेत जास्त प्रथिने आणि फायबर असतात. यामध्ये जीवनसत्वे बी, झिंक आणि मॅग्नेशिअमसारखे अनेक पोषक घटक असतात.

Food For Weight Loss
Indira Ekadashi 2024: पितृ पक्षात इंदिरा एकादशी 27 की 28 सप्टेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त

फुलकोबी तांदूळ

फुलकोबीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे हृदय आणि कर्करोगासह अनेक आजारांचा धोका कमी होतो. फुलकोबी तांदूळमध्ये कमी-कॅलरी असल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

दलिया

दलिया चवदार असून आरोग्यदायी देखील आहे. दलिया गव्हापासून बनवला जातो. तुम्ही वजन कमी करण्यासाठी दलिया खाऊ शकता. दलियामध्ये ९१ ग्रॅम दलियामध्ये ७६ कॅलरीज असतात. त्यामुळे भातापेक्षा दलिया उत्तम पर्याय ठरू शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.