- डॉ. मालविका तांबेसध्याच्या काळात मिलेटस् लोकप्रिय होत आहेत. ही धान्ये खरे तर भारतात हजारों वर्षांपासून सेवन केली जात आहेत. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये तर या धान्यांविषयी सविस्तर माहिती सापडते. मिलेटस् ला आयुर्वेदात तृणधान्ये असे म्हटलेले आहे. .तृणधान्ये ही गवतासारख्या वनस्पतीपासून तयार होतात. तृणधान्ये आकाराने लहान असतात. यांच्यात ग्लुटेन नसते आणि आधुनिक शास्त्रानुसार यांच्यात प्रथिने तसेच अँटिऑक्सिडंट असतात. तृणधान्ये ताकदीचा चांगला स्रोत असतात. यांच्यामुळे पचन सुधारते, श्र्वसनसंस्थेला मदत होते, रोगप्रतिकारक्षमता वाढते, शरीरात होणारे डीजनरेटिव्ह रोग कमी होतात, जीवनशैलीशी निगडीत मधुमेह, हृदयरोगासारखे रोग, कॅन्सर वगैरेंतही तृणधान्ये अत्यंत उपयोगी ठरतात..तृणध्यान्यांच्या उत्पादनासाठी पाणी कमी लागते, प्रतिरोधक्षमता जास्त असल्याने तृणधान्यांना कीड लागण्याचे प्रमाण खूप कमी असते. तसेच कमी प्रतीच्या जमिनीतही यांची लागवड सहजपणे करता येते. केवळ भारतातच नव्हे तर आफ्रिका व आशिया यांच्या काही जुन्या संस्कृतींमध्ये तृणधान्य वापराचा इतिहास दिसतो.ज्वारी, बाजरी, रागी, कोदू, सामा वगैरे तृणधान्यांचे काही लोकप्रिय प्रकार आहेत. आयुर्वेदात या धान्यांना क्षुद्रधान्य किंवा कुधान्य असे म्हटले जाते. यांची चव मधुर व कषाय, विपाक कटु, वीर्य किंचित उष्ण असते, ही धान्ये गुणांनी रुक्ष असतात, शरीरातील क्लेद शोषून घेणारी, बद्धविट्कम् (मलबद्धता वाढवणारी), अवृष्यम् (शरीरातील वीर्य कमी करणारी, वातदोष वाढवणारी, रक्त, पित्त व कफदोषासंबंधित रोगांचे हरण करतात.क्षुद्रधान्यं कुधान्यं च तृणधान्यमिती स्मृतम् ।क्षुद्रधान्यमनुष्णं स्यात्कषायं लघु लेखनम् ।।मधुरं कटुकं पाके रुक्षं च क्लेदशोषकम् ।वातकृद् बद्धविट्कं च पित्तरक्तकफापहम् ।।.यातील काही महत्त्वपूर्ण तृणधान्यांविषयी आपण आज बघू या.श्यामका : याला इंग्रजीत barnyard millet, मराठीत सामा वा भगर, गुजरातीत सामो, हिंदीत सावा असे म्हणतात. तृणधान्याचे उपरोक्त सगळे गुण भगरीत असतात. सध्या बऱ्याच लोकांना अति बृंहणामुळे अर्थात संतर्पणामुळे होणारे त्रास मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. वजन वाढणे, मधुमेह या दोन्ही त्रासांमध्ये भगरीचा वापर नियमित करण्याचा सल्ला संहितांमध्ये दिलेला सापडतो. भगर फारशी चविष्ट नसल्यामुळे अनेक जण हिचा वापर उपवासाच्या दिवशी सुद्धा टाळण्याचा प्रयत्न करतात. खरे तर भाताऐवजी भगर हा मधुमेह्यांसाठी उत्तम पर्याय आहे. इडली, डोसा, थालीपीठ, धिरडे वगैरे करताना भगरीचा वापर करणे उत्तम ठरू शकते. लहान मुलांनाही भगर देणे चांगले असते..चीनाक : हे तृणधान्य कांगूचाच एक प्रकार आहे. याला इंग्रजीत Prosso millet, हिंदीमध्ये चीनाक वा चायना व मराठीत वरई वा वरी असे म्हणतात. यात लोह व प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. यात व्हिटामिन बी३ मुबलक प्रमाणात असल्यामुळे डिमेंशिया, जुलाब, त्वचोराग वगैरेंत याचा वापर करायला सांगितलेला आहे. मुख्यत्वे गर्भवतीसाठी हे धान्य उत्तम समजले जाते. तसेच प्रसूतीनंतर स्त्रीची ताकद भरून यायला उत्तम समजले जाते. भारताबरोबर चीन, जपान, रशिया, तुर्की वगैरे देशांतही याचे उत्पादन घेतले जाते.कांगो : याला इंग्रजीत Foxtail millet, मराठीत राळा, हिंगीत कांगोनी म्हटले जाते. यात आधुनिक शास्त्रानुसार मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हे धान्य मधुमेह व हृदयरोगांत उत्तम असते. आयुर्वेदानुसार भग्न झालेली हाडे सांधण्यासाठी मदत करते, बृंहण करतो. हे पचायला थोडे जड असते, चवीला उत्तम असते. याच्या काळे, लाल, पांढरे, पिवळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतात. साधारणपणे या सगळ्यांचे गुण समान असतात..चीनका व कांगो ही दोन्ही धान्ये इडली, पोळी वगैरे करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.रागी : याला इंग्रजीत finger millet, हिंदीत रागी, मराठीत नाचणी वा नागली म्हटले जाते. आधुनिक शास्त्रानुसार नाचणीमध्ये नैसर्गिक कॅल्शियम व लोह मुबलक प्रमाणात असते. हिच्या वापराने हाडांची ताकद सुधारते तसेच हाडांचे फ्रॅक्चर झाले असता भरून निघायला मदत होते. नाचणीत तंतूमय घटक जास्त असल्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, गॅसेस सरण्यासाठी मदत होते. मधुमेह्यांसाठी तसेच गर्भवतींसाठी नाचणी उत्तम समजली जाते. बाळंतिणींसाठी नाचणीचा वापर केल्याने स्तन्यवृद्धीसाठी मदत मिळते. रक्ताल्पता, वजन कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे वगैरैंत नाचणीचा विशेष फायदा होतो. तान्ह्या बाळापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी नाचणी देणे उत्तम असते. नाचणी खीर करता येते, नाचणीच्या पिठाला उकड काढून वेगवेगळे रुचकर पदार्थ करण्याची पद्धत दक्षिण भारतात अजूनही आढळते. नाचणीचा उपयोग वेगवेगळ्या कृतींमध्ये, भाकरी करण्यासाठी होऊ शकतो..एकूणच सर्व प्रकारची तृणधान्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांनी परिपूर्ण असतात, स्थौल्य, प्रमेह, हृदयरोग, अपचन, वगैरेंमध्ये मदत करणारी असतात. सध्याच्या काळात मिलेटस् ने आपल्या ताटात मुख्य स्थान घ्यायला सुरुवात केली आहे. या सगळ्यांमध्ये ग्लुटेन नसल्यामुळे याचा वापर गव्हाच्या पिठासारखा सोपा नसतो. तसेच मिलेटस् शिजायला थोडे कठीण असतात. सगळीकडे मिलेटस् च्या पाककृती पाहायला मिळतात. छोट्या हॉटेलांपासून ते बेकऱ्यांपर्यंत सगळ्या ठिकाणी तृणधान्यांचा वेगवेगळ्या पदार्थांत उपयोग होऊ लागलेला आहे. घरातही भाकरी, खिचडी, इडली, डोसा, ब्रेड, वॉफेल्स, कुकीज् वगैरेंत तृणधान्यांचा वापर होताना दिसतो.एक महत्त्वाची गोष्ट येथे लक्षात ठेवायला हवी की शरीराच्या ताकदीसाठी वीर्याला मदत करणारा आहार घ्यावा असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. सध्या आपली दिनचर्या चुकीची होत आहे. खाण्यापिण्याच्या वेळा नीट पाळल्या जात नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चयापचय क्रियांमध्ये बदल होण्याची शक्यता वाढलेली आहे. अशा वेळी वीर्यवर्धक आहार अर्थात गहू, तांदूळ दूध, तूप बंद करून टाकणे कितपत योग्य ठरेल हे सांगता येत नाही. आहार संतुलित राहायला तृणधान्यांच्या वापराबरोबर याही गोष्टींना आपल्या पानात जागा देणे आवश्यक आहे. असे केल्याने प्रत्येक द्रव्यांचा आरोग्यदायी परिणाम मिळायला मदत होऊ शकेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.