Foods For Stamina : छोटी-मोठी कामे केल्याने लगेच थकवा येतो? मग, ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात ‘या’ सुपरफूड्सचा करा समावेश

Foods For Stamina : स्टॅमिना नसेल तर दैनंदिन कामे करताना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Foods For Stamina
Foods For Stamina esakal
Updated on

Foods For Stamina : छोटी-मोठी कामे केल्याने आजकाल अनेकांना लगेच दमायला होते, थकवा आणि अशक्तपणा देखील जाणवतो. परंतु, या समस्या जर सतत होत असतील, तर याकडे कृपया दुर्लक्ष करू नका. कदाचित हे तुमच्या शरीरातील ताकद कमी झाल्याचे संकेत असू शकतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी.

शरीराला नेहमी ऊर्जावान ठेवण्यासाठी स्टॅमिना खूप महत्वाची भूमिका बजावतो. स्टॅमिना ही खरं तर आपल्या शरीराची शक्ती आहे. हा स्टॅमिना नसेल तर दैनंदिन कामे करताना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की, अशक्तपणा, चक्कर येणे आणि थकवा होय.

अशा परिस्थितीमध्ये आपले शरीर ऊर्जावान ठेवण्यासाठी तुम्ही स्टॅमिना वाढवायला हवा. हा स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्ही सकस आहाराची मदत घेऊ शकता. त्यासाठी कोणत्या खाद्यपदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करायला हवा? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Foods For Stamina
Foods For Brain : छोट्या-छोट्या गोष्टींचा विसर पडतोय? मग, मेंदूला तल्लख बनवण्यासाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

'व्हिटॅमिन सी' युक्त फळे

व्हिटॅमिन सीयुक्त फळे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत. या फळांचे सेवन केल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात ताकद मिळते. आवळा, संत्री आणि लिंबू यांसारख्या ‘व्हिटॅमिन सी’ युक्त फळांचा आहारात अवश्य समावेश करा. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच कॅल्शिअम आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते. या लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि स्टॅमिना वाढवण्यास मदत होते.

पालक

हिरव्या पालेभाज्यांमध्ये आवर्जून खाल्ली जाणारी पालेभाजी म्हणजे पालक होय. या पालकमध्ये लोह, कॅल्शिअम आणि जीवनसत्वांचे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, पालकचे सेवन केल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी पालकच आहारात अवश्य समावेश करा. लाल रक्तपेशी वाढवण्यासोबतच रक्त परिसंचारन सुधारण्याचे काम पालक करते. त्यामुळे, पालकचे जरूर सेवन करा आणि भरपूर ऊर्जा मिळवा.

बदाम

बदाम खाणे, आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. प्रथिने आणि फायबर्सचा प्रमुख स्त्रोत असणारे बदाम खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. या पोषकघटकांमुळेच बदामचे सेवन केल्याने पोट काही काळ भरलेले राहते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. त्यामुळे, स्टॅमिना वाढवण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.