या पदार्थांमुळे Kidney मध्ये युरीक ऍसिड वाढून होऊ शकतात गंभीर आजार, वेळीच किडनी निकामी होण्याचा धोका टाळा

किडनीची समस्या निर्माण होण्यासाठी किंवा किडनी निकामी होण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. यापैकीच एक म्हणजे शरीरात वाढलेलं युरीक ऍसिडचं Uric Acid प्रमाण
किडनीचे रक्षण
किडनीचे रक्षणEsakal
Updated on

किडनी हा शरीरातील अवयवांपैकी एक अत्यंत महत्वाचा असा अवयव आहे. शरीरातील रक्त शुद्धीकरण करण्यासोबत शरीरातील घाण बाहेर टाकण्याचं महत्वाचं कार्य किडनी Kidney करत असते. foods to avoid for kidney and uric acid patients to prevent damage and stones

तसंच किडनी शरीराचील ऍसिड बाहेर टाकण्याचं काम करते सोबतच रक्तातील पाणी, मीठ Salt आणि मिनरल्सचं संतुलन राखण्याचं महत्वाचं कार्य देखील किडनी करते. यामुळेच किडनीच्या समस्या निर्माण झाल्यास किंवा किडनी Kidney निकामी झाल्यास इतर गंभीर आजारांचा धोका देखील वाढण्याची दाट शक्यता असते.

किडनीची समस्या निर्माण होण्यासाठी किंवा किडनी निकामी होण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. यापैकीच एक म्हणजे शरीरात वाढलेलं युरीक ऍसिडचं Uric Acid प्रमाण. रक्तात युरीक ऍसिडचं प्रमाण वाढल्या किडनीवर गंभीर परिणाम होवू शकतो.अगदी मूतखडा होण्यापासून के किडनी निकामी होणं अशा विविध समस्या यामुळे निर्माण होवू शकता.

रक्तातील युरिक ऍसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी तसंच नियंत्रणात राखण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. शिवाय आहारात काही पदार्थांचं सेवन टाळणं अत्यंत गरजेचं आहे. या पदार्थांमुळे रक्तात युरिक अॅसिड वाढू शकतं. हे पदार्थ कोणते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

किडनीचे रक्षण
Kidney Stone Ayurvedic Treatment : या आयुर्वेदीक वनस्पतीमुळे किडनी स्टोन बर्फासारखा वितळेल; ट्राय करून बघा!

लाल मांस- रेड मीट किंवा लाल मांसाच्या सेवनाने शरीरामध्य युरीक ऍसिड वाढण्याचा धोका जास्त असतो. कारण सर्व प्रकारच्या रेट मेटमध्ये प्यूरिनचं प्रमाण अधिक असतं. प्युरीनचं प्रमाण वाढल्याने युरिक ऍसिडचं संतुलन बिघडतं यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते.

अल्कोहोल- दारू आणि खास करून बीयरच्या सेवनामुळे तुमच्या किडनी आणि लिवरवर दुष्परिणाम तर होतोच शिवाय यामुळे शरीरातील युरिक ऍसिडची पातळी देखील वाढते. दारुमध्ये मोठ्या प्रमाणात प्युरीन आढळतं. यामुळे रक्तातील यूरीक ऍसिड जलद गतीने वाढतं.

मिठाई- खरं तर गोड खाणं किंवा मिठाई खाणं अनेकांना आवडतं. मात्र मिठाई खाल्ल्याने वजन तर वाढतंच शिवाय यामुळे रक्तात यूरिक ऍसिड देखील वाढतं. मिठाई तसचं बाजारांमध्ये मिळणाऱ्या टेट्रा पॅक किंवा अन्य गोड पेयांमध्ये फ्रुक्टोज आढळतं जे यूरीक ऍसिड वाढवत.

सीफूड- जर तुम्हाला यूरिक ऍसिड वाढण्याची समस्या असेल तर माशांचं सेवन त्वरिस बंद करावं. मासे चवीला रुचकर असले तरी त्यात प्युरीनचं प्रमाण जास्त असल्याने ते खाणं टाळावं.

आंबट फळं आणि पदार्थ- आंबट फळांमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळतं. याशिवाय इतरही अनेक पोषक तत्व फळांमध्ये आढळतात. मात्र काही फळांच्या सेवनामुळे युरीक ऍसिड वाढण्याची शक्यता असते. यामुळेच या फळांचं सेवन कमी करावं किंवा टाळावं. यामध्ये लिंबाचं सेवन टाळावं. तसचं सफरचंदामध्ये फ्रूक्टोज प्रमाण अधिक असल्याने सफरचंदाचं जास्त सेवन केल्यास यूरीक ऍसिड वाढू शकतं.

इतर पदार्थ- या पदार्थांशिवाय पनीर, राजमा तसचं दूध या प्रोटीनयुक्त पदार्थांमुळेदेखील युरीक ऍसिडचं प्रमाण वाढू शकतं. तसचं सालासहित असलेल्या डाळीचं देखील सेवन कमी करावं.

यासोबतच रात्रीच्या वेळी आहारातमध्ये भात, डाळींचं सेवन करणं तसचं गोड पदार्थ खाणं यामुळे युरीक ऍसिड वाढण्याची शक्यता जास्त असते. यासाठी हे पदार्थ आहारातून कमी करावे आणि रक्तातील युरीक ऍसिडचं प्रमाण नियंत्रणात राखावं. यामुळे तुमची किडनी निरोगी राहण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.