अपराधाची भावना

आदित्यच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे त्याच्या पत्नीच्या मन:स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे. दोन महिन्यांनीही ती शोकाच्या या दु:खातून सावरू शकलेली नाही आणि तिच्या मनात एक विचित्र भावनिक घुसमट आहे.
 Forgiveness and emotional healing
Forgiveness and emotional healing sakal
Updated on

डॉ. विद्याधर बापट

क्षमा माझ्याकडे आली, तेव्हा खूप विचित्र मन:स्थिती होती तिची. घडलेली घटना कुठल्याही पत्नीसाठी पराकोटीचं दु:ख देणारीच होती. तिच्या पतीचा, आदित्यचा अचानक अपघाती मृत्यू झाला होता. या गोष्टीला आता दोन महिने होऊन गेले; पण ती तीळभरही सावरू शकली नव्हती. ती पुण्यात राहत होती आणि कंपनीच्या पोस्टिंगप्रमाणे काही महिने आदित्य मुंबईत राहत होता. साधारणपणे शनिवार-रविवार तो पुण्याला येत असे. क्वचितच असं घडे, की emergency मुळे त्याला यायला मिळत नसे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.