काहीवेळा आपण ताजे अन्न खातो तरीही आपल्याला त्रास होतो. ज्या गोष्टी पचायला हलक्या आहेत त्या खाल्यानेही काहीवेळा त्रास होतो. मग विचार करा की, पचायला जड असणारे पदार्थ शिळे खाल्ले तर किती त्रास होईल. असे शिळे पदार्थ खाऊन आरोग्याच्या समस्याही सुरू होतात आणि तो पदार्थ खायची इच्छाही मरून जाते. How to identify fresh or stale mutton
मांसाहारावर प्रचंड प्रेम करणारे लोक आहेत. काही लोकांचा तर मांसहराशिवाय दिवस संपत नाही. हॉटेलमध्ये ताटात जे येईल ते शिळे की ताजे आपल्याला कुरबुर न करता खावे लागते. पण घरी तरी आपण फ्रेशच मटन किंवा चिकन आणतो. ते खाऊनही आपल्याला काहीवेळा त्रास होतो.
मटण ताजेच बनवलेलं असते. पण, मटण विकणारे लोक अनेकदा त्यात शिळे मांस मिक्स करून विकतात. त्यामुळे आपण फसवले जातो. घरातले लोकही म्हणतात की, तूम्हाला मटण आणायचं कळत नाही. कायमच शीळ घेऊन येता. हे टोमणे ऐकायचे नसतील तर इथून पुढे मटण चिकन खरेदी करताना काय काळजी घ्यावी हे पाहुयात...
रंग पहावा
चिकन किंवा मटण ताजे असेल तर त्याचा रंग अगदी गडद असतो. पण शिळ्या चिकन मटणाचा रंग थोडा फिका पडलेला असतो.
गंध येतो
मास ताजे असते तेव्हा त्याचा घाण वास येत नाही. पण शिळे झाल्यावर मांसावर प्रक्रिया होते आणि ते कुजायला लागते. त्यामुळे त्याचा दुर्गंध येतो.
स्पर्श करून पहा
चिकन किंवा मटण फ्रेश आहे हे ओळखायचे असल्यास ते स्पर्श करून तपासता येते. खरेदी करण्याआधी त्याला हात लावून पहावे. चिकन हाताला चिकट लागले तर ते शिळे आहे असे समजावे. तर उलट ताजे मटण हाताला चिटकत नाही.
शिजताना ही लक्षात येते
काहीवेळा आपण मटण फ्रेश आहे म्हणून घेऊन येतो आणि ते शिजवतो.त्यावेळी अगदीच शिळे असलेले मटण शिजायला वेळ लागतो. ते शिजल्यावरही त्यांचा रंग काळपट दिसतो. अशावेळी समजायचं की मटण खूपच शिळे आहे.
कोणतं मटन खाण्यासाठी चांगले
मध्यमवयीन बकऱ्याचे मटण खाण्यासाठी चांगले मानले जाते. कोवळे मटण लगेच शिजते पण राळे होते. त्याची हाडं खाता येत नाहीत. तसेच, वयाने जास्त असलेले बकऱ्याच मटण शिजायला वेळ लागतो आणि चवीला फार चांगलं लागत नाही.
कोणते पीस घ्यावेत
मटण घेताना हाडे आणि मऊ समप्रमाणात घ्यावे. हाडांमुळे आमटीला चांगली चव येते. मऊ मटण खाण्यात सहसा सगळे आनंदी असतात. मांडीचा थोडा भाग घ्यावा. यात नळी मिळते. काळीज लहान मुलांसाठी चांगली असते त्यामूळे काळीज हमखास घ्यावे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.