व्यक्तिमत्त्व विकासाच्या मोजमापाचा पहिला निकष म्हणजे बुद्ध्यंक. त्यानंतर भावनांक आणि ज्या ठिकाणी अत्युच्च शिखरावर जाऊन पोचायचे तो आत्मसमाधानांक. यावर मिळणारी जी पदवी ती म्हणजे बुद्धत्व. मनुष्य मूलतः जणू बुद्दू असतो आणि तेथून त्याला बुद्ध होण्याची ओढ असते.
पण खरे पाहता प्रत्येक व्यक्ती ही परमेश्र्वराचा अंश असतो, म्हणजेच बुद्ध स्थितीलाच असते. त्यावर आलेली आवरणे काढली की आतील बुद्धत्वाचा प्रकाश चौफेर पसरतो.