- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ
एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे तिचं शरीर सळसळत होतं. एका आसनातून तिनं दुसऱ्या आसनात कधी प्रवेश केला हे प्रेक्षकांना कळण्यापूर्वीच गिरकी घेत क्षणार्धात ती पुढच्या अवघड आसनात गेलेलीही असायची. दहा मिनिटात पंचवीस-तीस आसनं करून ती मंचावरून खाली उतरली. टाळ्यांच्या कडकडाटात सर्कशीचा तंबू दुमदूमुन गेला.
...शो झाल्यावर पस्तिशीतल्या त्या सर्कससुंदरीला भेटायला गेलेल्या वार्ताहराला तिची अवस्था पाहून धक्काच बसला. दुरून सडसडीत दिसणारं शरीर अनेक वर्ष सर्कस-आसनं करून अशक्त (ॲनिमिक) झालेलं होतं. लांबून (मेकअपमुळे) आकर्षक वाटणारा चेहरा जवळून वेगळंच काही सांगत होता.