‘गट हेल्थ’ प्रणालीचे कार्य

जीवाणू आपल्या आयुष्याचा, आरोग्याचा अविभाज्य घटक आहेत व आरोग्यासाठी ते खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यांची कार्ये आपण पाहूया.
Bacteria
Bacteriasakal
Updated on

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

आपण मागील लेखात पाहिल्याप्रमाणे, आपल्या पाचक ट्रॅक्टमध्ये कोट्यवधी सूक्ष्मजीवांची वस्ती असते. खरं तर आपल्या वजनात दोन किलो वजन या सूक्ष्मजीवांचे असते हे समजल्यानंतर मला खूप विशेष वाटले होते. हे जीवाणू आपल्या आयुष्याचा, आरोग्याचा अविभाज्य घटक आहेत व आरोग्यासाठी ते खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यांची कार्ये आपण पाहूया.

जीवनसत्त्व ब व जीवनसत्व के, फॉलिक ॲसिड इत्यादी महत्त्वाचे घटक तयार करण्याचे कार्य : मानसिक व भावनिक आरोग्य जपण्यामध्ये लागणारी न्युरोट्रान्स्मिटर केमिकल्स मुख्यतः गट म्हणजे आतड्यांमध्ये तयार होतात. नव्वद टक्के सिरोटोनिन, पन्नास टक्के डोपामाइन हे आपल्या आतड्यांमध्ये तयार होतात. आपल्याला येणारे विचार, वाटणारी भीती, भावनिक ताण हे सर्व या केमिकल्समुळे होऊ शकते.

यांचे प्रात्यक्षिक बघायचे असल्यास संबंध एक महिना आपण चार वेळा जंक फूड खात राहा आणि महिन्याशेवटी मानसिक आणि भावनिक अवस्था काय होते ते पाहा. तसेच झोपेसाठी लागणारी रसायनेही इथे तयार होतात. पोटातील या जीवाणू वस्तीला ‘दुसरा मेंदू’ म्हटले जाते, कारण तिथे पन्नास कोटींहून अधिक न्यूरॉन्स आढळले आहेत.

  • पचन व्यवस्थित होण्याकरिता लागणारी एंझाइम्स तयार करणे; तसेच मुख्यतः फायबरयुक्त अन्नपदार्थांचे पचन करणे. थोडक्यात पचन यंत्रणा आरोग्यपूर्ण अवस्थेत ठेवणे व राबवणे.

  • अन्नावाटे पोटात गेलेल्या व शरीरासाठी घातक असणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंचा नाश करून आपले रक्षण करणे; तसेच शरीरासाठी घातक पदार्थ (टॉक्झिन्स) यांचे हानिकारक परिणाम कमी करून आपला बचाव करणे.

  • आपल्या शरीरातील हाडांच्या घनतेवरही आतड्यांमधील आरोग्याचा परिणाम होत असतो. आतड्यांमध्ये सूक्ष्मजीवांची वस्ती आरोग्यपूर्ण असेल, तर दीर्घकाळ आपली हाडे मजबूत राहतात आणि त्यांची घनता अधिक राहते.

शरीरमधील चरबीचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यामध्ये गट हेल्थचा मोठा वाटा असतो. मुळात आपण जे काही ग्रहण करतो ते शरीरामध्ये कोणत्या स्वरूपात जाते हे सर्व आपल्या ‘गट हेल्थ’च्या आरोग्यावर अवलंबून असते म्हणून काही जणांनी काहीही खाल्ले, तरी त्यांचे वजन वाढत नाही व काही जणांनी थोडे खाल्ले तरी शरीरावर चरबीरूपात ते प्रकट होते.

आपल्या प्रतिकारशक्तीच्या शृंखलेमध्ये ‘गट हेल्थ’ खूप महत्त्वाची भूमिका बजावते. सत्तर टक्के प्रतिकारशक्ती ही आतड्यांमधील सूक्ष्मजीवाणूंच्या आरोग्यावर अवलंबून असते. इतकेच नाही, तर चांगली प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी आयुष्याच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये आपली ही जीवाणूंची वस्ती किती चांगली, आरोग्यपूर्ण तयार होते, यावर आयुष्यभरात आपल्याला autoimmune आजार होतील का, संधिवात होईल का, कॅन्सर होईल का इत्यादी गोष्टी अवलंबून असतात.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शरीरातील क्रोनिक सूज (inflammation) व कॅन्सर तयार होण्याची प्रक्रिया या दोन्हीला बळावण्यापासून थांबवणारे घटक हे सूक्ष्मजीव तयार करतात.

हे व अजून अशी अनेक कार्ये आहेत ज्यावर संशोधन चालू आहे. थोडक्यात काय आपल्या आरोग्याच्या बहुतांश गोष्टी या गट हेल्थवर अवलंबून असतात आणि ती बिघडली तर आपले आरोग्य चांगले राहणे अशक्य आहे. हे जीवाणू आपल्या पेशींच्या खांद्याला खांदा लावून आपल्या आरोग्यासाठी कार्यरत असतात, त्यामुळे त्यांचा समतोल आणि आरोग्यपूर्ण अवस्था हेही आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. गट हेल्थ कशी जपावी, कोणत्या गोष्टींचा तिच्यावर चांगला व वाईट परिणाम होतो हे आपण पुढील भागात पाहूया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com