Modak Health Benefits: कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेश पूजनाने केली जाते. मान्यतेनुसार असे केल्यास कामात यश मिळते. सध्या देशभरात गणेशोत्सावाची जल्लोषात तयारी सुरू आहे.
यंदा गणेश चतुर्थीचा सण ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. गणेश चतुर्थीला फक्त एकच दिवस शिल्लक राहीला असून गणेश भक्तांमध्ये गणरायाच्या आगमनाची आतुरता लागली आहे.
गणरायाला मोदक खुप आहे. यामुळे सर्वजण गणेशाला मोदक अर्पण करतात. गणेशोत्सवात पूजेसह आरोग्याचीही काळजी घ्यायची असेल तर आरोग्यदायी मोदक बनवावे. जसे की तुम्ही सुकामेवा, नारळ, पनीर यांचे स्टफिंग असलेले मोदक तयार करू शकता. या मोदकांचे सेवन केल्यास रक्तदाब किंवा वजन वाढणार नाही. तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवते. पण मोदक खाण्यापुर्वी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.