सगळ्यांना श्रीगणेशांच्या स्वागताचे वेध लागलेले आहेत. तसे पाहता प्रत्येक घरात रोजच श्रीगणेशांचे पूजन केले जाते. बहुतेकांच्या देव्हाऱ्यातील पंचायतनात गणपतीचा समावेश असतो. वटपौर्णिमा, नागपंचमी, बैलपोळा, रामनवमी, शिवरात्री असे वर्षभरात एका दिवसांचे असे अनेक उत्सव येतात. परंतु नऊ ते दहा दिवस चालणारे उत्सव फक्त दोनच, एक श्रीगणेशोत्सव आणि दुसरा श्रीदेवीचे नवरात्र.