Gas Problem : पोटात सारखा गॅस होतो? ही फळे उपाशी पोटी खा अन् आराम मिळवा

अनेकांना पोटात गॅस होण्याची समस्या असते.
Gas Problem
Gas Problemesakal
Updated on

Some Fruits To Reduce Gas Problem :

हल्लीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे पोटाच्या समस्या बहुतेकांमध्ये बघायला मिळतात. यात अॅसिडिटी आणि गॅस होणे या तर फारच सामान्य समस्या झाल्या आहेत. यामुळे पोटात दुखणे ही समस्या होतेच पण चार चौघात अवघडलेपणही येते.

पण या समस्येचे निवारण करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक उपाय म्हणजे सकाळी उपाशी पोटी ही फळे खाणे. जाणून घेऊया सविस्तर.

Gas Problem
Gas Problemesakal

ही फळे खावीत

केळी

केळीमध्ये कॅल्शियम, फायबर इतर पोषक घटक असतात. सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅसची समस्या कमी होऊ शकते.

कलिंगड

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. हे खाल्ल्याने गॅसची समस्या कमी होते. कारण यात असलेले फायबर अन्न पचवण्यास मदत करते.

किवी

किवीमध्ये व्हिटॅमीन सी जास्त प्रमाणात असते. आहारात याचा समावेश केल्यास अनेक समस्यांपासून आराम मिळतो. गॅसच्या समस्येवर हे फळ खूप उपयुक्त आहे.

Gas Problem
Stomach Health Tips : पोटातून येतो गुरगुरण्याच्या आवाज, तुम्हाला हा आजार तर झाला नाहीय ना?
Gas Problem
Gas Problemesakal

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी इत्यादी पोटासाठी खूप फायदेशीर आहे. गॅसची समस्या कमी करण्यासाठीही हे फळ उपयुक्त आहे.

अंजीर

अंजीरमुळे गॅसच्या समस्येपासून सुटका मिळते. यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन बी आदी आरोग्यासाठी खूप फायदेशीर घटक आहेत.

सफरचंद

सफरचंदात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजे असतात. हे फळ पोटासाठी फार उपयुक्त असते.

नाशपती

पोटासाठी हे फळ फार उपयुक्त आहे. त्यात बद्धकोष्ठता, गॅसची समस्येवर हे गुणकारी ठरते. निरोगी राहण्यासाठी आहारात याचा नक्की समावेश करावा.

Gas Problem
Clean Stomach Naturally : टॉयलेटमध्ये तासनतास बसूनही पोट साफ होत नाही, मग काय कराव?

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.