तिळाचे महत्त्व

पौष्टिकतेच्या दृष्टीने तीळ पोषकतत्वांचा खजिनाच आहे. तीळ हे प्रथिने, हेल्दी चरबी, तंतुमय पदार्थ आणि कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम व फॉस्फरससारखी अनेक जीवनसत्वे व क्षारांनी समृद्ध असतात.
Sesame Rice
Sesame Ricesakal
Updated on

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण मकरसंक्रांत, पोंगल किंवा लोहडी म्हणून साजरे केले जाते. लवकर संपणारे हिवाळ्याचे दिवस संपून दिवसांची लांबी वाढू लागते. भारतात सर्व ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याकाळात तीळ या तेलबियांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. या छोट्याशा तेलबिया भरभराट आरोग्य व तोडणीच्या हंगामाचा उत्सव साजरा करताना पौष्टिकता व सांस्कृतिक असे अनेक पेलू दर्शवतात.

पौष्टिकतेच्या दृष्टीने तीळ पोषकतत्वांचा खजिनाच आहे. तीळ हे प्रथिने, हेल्दी चरबी, तंतुमय पदार्थ आणि कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम व फॉस्फरससारखी अनेक जीवनसत्वे व क्षारांनी समृद्ध असतात. हिवाळ्यात आवश्यक असणारी उष्णता व ताकद पुरवतात. शरीरात ताकद निर्माण करून साधारण आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदातही तिळाचे महत्त्व सांगितले आहे.

भारतात या सणांत तीळ आणि गुळापासून बनवलेल्या मिठाईचे विशेष महत्त्व आहे. तिळाप्रमाणेच गुळापासूनही पोषकतत्त्वे आपल्या शरीराला पुरवली जातात. साखरेपेक्षा उसाचा रस किंवा पाम सालापासून बनलेला, नैसर्गिक गोडवा देणारा गूळ हा लोह व पोटॅशिअमसारखे क्षार समाविष्ट असल्याने जास्त पौष्टिक असतो.

ऋतुमानाप्रमाणे संक्रांत, पोंगल किंवा लोहडी हा सण हिवाळी पिके कापणीला येतात त्यावेळी साजरा होतो. या पिकात तिळाचाही समावेश होतो. ताजे तीळ व गुळाची उपलब्धता तिळगूळ व इतर तीळयुक्त पदार्थ बनवण्यास ही योग्य वेळ असते. या ताज्या पिकापासून मिळालेल्या उत्पन्नाचा खाद्यसंस्कृतीत उपयोग करून धरतीचे ऋण मानले जातात व उत्सव साजरा केला जातो.

सांस्कृतिकरीत्या तीळ हे संक्रांत, पोंगल आणि लोहडीच्या परंपरांशी मिळतेजुळते आहेत. या सणांमधे तीळ हे लाडू, वड्या, चिक्की, रेवडी यांसारख्या विविध मिठाया व चटणी, तीळ-भात, थालीपीठ व इतर पदार्थांत वापरले जातात. या पदार्थांची एकमेकांकडे देवाणघेवाण केल्याने आनंद, प्रेम व सद्‍भावना निर्माण होतात. काही ठिकाणी भरपूर उत्पन्नाप्रति कृतज्ञता व आगामी वर्षातील समृद्धीसाठी यज्ञ करून तिळाची आहुती दिली जाते.

लोक पीक तोडणीचे व वसंतऋतुचे आगमन साजरे करतात, तेव्हा तीळ त्यांना आपल्या खाद्यसांस्कृतिक परंपरेच्या वैभवाची आणि आनंदित निसर्गाची आठवण करून देतात. या पदार्थांमुळे केवळ त्यांच्या आवडत्या स्वादाचा आनंद मिळतो असे नाही तर परंपरागत सांभाळल्या गेलेल्या खाद्यसंस्कृतीचा ते भाग बनतात. संक्रांतीला आपण एकमेकांना प्रेमाने एकत्र करणाऱ्या तिळगुळाची देवाणघेवाण करूया.

तिळाचा भात

साहित्य - अडीचकप कप तयार भात, पाच चमचे तीळ, पाच चमचे किसलेले सुके खोबरे, दीड चमचा चणाडाळ, दीड चमचे उडीद डाळ, तीन मोठे चमचे तेल, एक छोटा चमचा मोहरी, एक चमचा चिंच कोळ, चिमूटभर हिंग, चवीनुसार गूळ व मीठ, ८ ते १० पाने कढीपत्ता.

कृती -

  • कढईत तीळ व खोबरे गुलाबी भाजून हलके कुटून घ्यावे.

  • भात मोकळा करून त्यात चिंचेचा कोळ, गूळ, मीठ व तीळ-खोबरे व्यवस्थित कालवून घ्यावे.

  • कढईत तेल गरम करून उरलेले सर्व जिन्नस घालून फोडणी करावी व भातावर ओतून मिसळून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.