Vitamin D: पावसाळ्यात Sunlight ऐवजी 'या' प्रकारे पूर्ण करा व्हिटॅमिन D ची कमतरता

पावसाळ्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होत असल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. यासाठीच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही व्हिटॅमिन डीची करतरता पूर्ण करू शकता
व्हिटॅमिन डी साठी
व्हिटॅमिन डी साठीEsakal
Updated on

शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी सगळ्याच व्हिटॅमिन्सची शरीराला आवश्यकता असते. यातील काही व्हिटॅमिन हे शरीर स्वत: तयार करतं. तर काही व्हिटॅमिन्ससाठी Vitamins विविध पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा लागतो. Get Vitamin D in Monsoon in absence of sunlight

यापैकी शरीरासाठी अत्यंत गरजेचं असलेलं व्हिटॅमिन डी Vitamin D हे खास करून सुर्यप्रकाशातून मोठ्या प्रमाणात मिळत असतं. मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये Monsoon ढगाळ वातावरणामुळे सुर्याचं फारसं दर्शन होत नसल्यामुळे Vitamin Dची कमतरता निर्माण होते.

पावसाळ्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होत असल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. यासाठीच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही व्हिटॅमिन डीची करतरता पूर्ण करू शकता.

उपलब्ध सुर्यप्रकाशाच्या वेळेचा सदुपयोग करा

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ढगाळ वातावरणामुळे जरी सुर्य ढगांआड लपला जात असला. तरी अधुमधून सुर्यप्रकाश Sunlight हा येतच असतो. तेव्हा अशा संधी अजिबात सोडू नका. सुर्यप्रकाश दिसताच मग ती सकाळची वेळ असो वा दुपारची. शक्य तेवढा वेळ सुर्यप्रकाशात घालवा.

तुम्ही घराच्या किंवा ऑफिसच्या बाल्कनीत किंवा छतावर जाऊ शकता. या सुर्यप्रकाशात एक छोटासा वॉक घ्या जेणेकरून शरीराला सुर्यप्रकाश मिळू शकेल.

आहारातून Vitamin Dची करमतरता करा दूर

सुर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत असला तरी काही पदार्थांच्या सेवनाने तुम्ही व्हिटॅमिन डी मिळवू शकता. यासाठीच पावसाळ्यात आहारामध्ये जास्तीत जास्त व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा समावेश करा.

यासाठी तुम्ही आहारामध्ये दूध आणि दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता. त्याच प्रमाणे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात अंडी, मासे, मशरुम, पालक, संत्री आणि धान्य तसचं कडधान्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करा.

हे देखिल वाचा-

व्हिटॅमिन डी साठी
Vitamin D Recipe : उन्हात न बसताही 'हा' पुलाव खाऊन पूर्ण करा व्हिटॅमिन डी ची कमतरता

व्यायाम

व्यायामामुळे शरीराचं मेटाबोलिजम म्हणजेच चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते. यासाठीच योगा, ध्यान धारणा आणि वर्कआउट करण्यावर भर द्या. पावसाळ्यात व्यायाम आणि योगामुळे Yoga रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारांना देखील दूर ठेवणं शक्य होईल.

आउटडोर अॅक्टिव्हिटी

पावसाळ्यातील काही दिवस पाऊस काहीसा ब्रेक घेतो. अशा वेळी काही आउटडोर अॅक्टिव्हिटी करण्यावर भर द्या. सायकलिंग करणं, बॅडमिंटन किंवा क्रिकेट सारखे आऊटडोर खेळ खेळा. तसचं तुम्ही केवळ जॉगिंग किंवा एक फेरफटका देखील मारू शकता. यामुळे तुम्हाला फ्रेश तर वाटेलच शिवाय सुर्यप्रकाशात काही वेळ घालव्याने व्हिटॅमिन डी ची कमतरचा दूर होते.

आंघोळ करताना घ्या ही काळजी

जेव्हा तुम्ही सुर्यप्रकाशात राहता तेव्हा तुमच्या त्वचेच्या माध्यमातून शरीर व्हिटॅमिन डीची निर्मिती करत असतं. मात्र जर तुम्ही लगेच आंघोळ केली तर व्हिटॅमिन डीची प्रभावीपणे निर्मिती होत नाही. यासाठीच सुर्यप्रकाशातून घरात आल्यावर लगेच आंघोळ करू नका. घरी परतल्यावर किमान अर्धा तांसांनी आंघोळ करा.

व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स

काही वेळेस सुर्यप्रकाशात जाणं शक्य होतं नाही. तसचं आहारातूनही व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघत नाही. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेऊ शकता. यासाठी अर्थातच डॉक्टरांच्या सल्ला घेणं गरजेचं आहे.

अशा प्रकारे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

व्हिटॅमिन डी साठी
Vitamin D Deficiency : तुमची झोप उडवायला कारणीभूत आहे हे व्हिटॅमिन? झोपेच्या गोळ्या नाही हे पदार्थ खा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.