- डॉ. विराज वैद्य, संस्थापक, मेधा-एआय
दैनंदिन जीवनाच्या धावपळीत, जिथे आरोग्य अनेकदा मागे पडते, तिथे आपल्या शरीरातील फिल्टर असलेल्या आपल्या मूत्रपिंडाचे (किडनी) सूक्ष्म कार्य समजून घेणे महत्त्वाचे आहे. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट (GFR) चाचणी या महत्त्वाच्या अवयवांचे कार्य किती चांगले आहे याचे मूल्यांकन करणाऱ्या मुख्य चाचण्यांपैकी एक आहे. ही साधी; पण महत्त्वाची चाचणी तुमच्या किडनीच्या आरोग्याविषयी योग्य माहिती देऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आरोग्य राखण्यासाठी सक्रिय पावले उचलता येतात.