Ginger Peel : आल्याची साल फेकून देऊ नका, सालीपासून बनवा हे डिटॉक्स वॉटर

काही लोक आल्याची साल कचरा समजून फेकून देतात. तुम्हीही असे करत असाल तर आजच थांबा
Ginger Peel
Ginger Peelesakal
Updated on

Ginger Peel : आल्यामध्ये भरपूर प्रमाणात आरोग्यदायी गुणधर्म असल्याने आलं शरीरासाठी पोषक आहे. चहामध्ये रोज आलं टाकण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र काही लोक आल्याची सालं कचरा समजून फेकून देतात. तुम्हीही असे करत असाल तर आजच थांबा. आल्याच्या सालापासून डिटॉक्स वॉटर तुम्ही बनवू शकता.

डिटॉक्स वॉटरचे सेवन केल्याने तुमच्या पोटातील आणि शरीरातील सर्व टॉक्झिक पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे या पाण्याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रियाही निरोगी राहते, चला तर मग जाणून घेऊया आल्याच्या सालीपासून डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे ते.

त्यासाठी लागणारे साहित्य

आल्याची साल १ टेस्पून

चहाची पाने १/४ टीस्पून

पाणी 2 कप

लिंबाचा रस 1 टीस्पून

चहाची पाने १/४ टीस्पून

पाणी 2 कप

लिंबाचा रस 1 टीस्पून

Ginger Peel
Turmeric Detox Water : बॉडी डिटॉक्स करणाऱ्या हळदीचं पाणी रोज पिणं योग्य आहे का? तज्ज्ञ सांगतात...

आल्याच्या सालीचे डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे?

आल्याच्या सालीचे डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी सर्वप्रथम एक पॅन घ्या.

नंतर त्यात पाणी टाका आणि थोडा वेळ उकळायला ठेवा.

यानंतर, तुम्ही त्यात चहाची पाने टाका आणि सुमारे 2 मिनिटे गरम करा.

नंतर त्यात आल्याची साले टाकून ती चांगली उकळावी.

यानंतर गॅस बंद करा आणि गाळणीच्या मदतीने पाणी गाळून घ्या.

आता तुमचे आल्याच्या सालीचे डिटॉक्स वॉटर तयार आहे.

नंतर एका कपमध्ये गाळून घ्या आणि थोडा लिंबाचा रस टाकून प्या. (Health)

Ginger Peel
Detox Drink : रात्रभर पाण्यात भिजवलेले हे पदार्थ शरीर करतील डिटॉक्स, Weigh Loss साठी जालीम उपाय!

आल्याची सालीचे पाणी पिण्याचे फायदे

आल्याच्या सालीचे पाणी पिल्याने तुमचा मेटाबोलिझम पावर वाढतो. सोबतच तुमची चयापचनाची शक्तीही वाढते. आणि वजन कमी होण्यासही मदत होते. रोज सकाळी या पद्धतीने हे पाणी पिऊन बघा तुम्हाला फरक जाणवेल. (Benefits)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.