Ginger Tea in Monsoon : बदलत्या हवामानात आजारांपासून दूर राहायचंय? मग, रोज प्या आल्याचा चहा, मिळतील भरपूर फायदे

Ginger Tea in Monsoon : काही जण या दिवसांमध्ये स्वत:ला तंदूरूस्त ठेवण्यासाठी आल्याचा चहा पितात.
Ginger Tea in Monsoon
Ginger Tea in Monsoonesakal
Updated on

Ginger Tea in Monsoon : सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून, संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा इत्यादी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या दिवसांमध्ये वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शिवाय, पावसाळ्यात लहान मुले आणि वयोवृद्धांची रोगप्रतिकारकक शक्ती देखील कमी झालेली असते

त्यामुळे, या दिवसांमध्ये आपण लवकर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात आणि पूर आलेल्या भागातील नागरिक आजारी पडू नये, यासाठी विविध उपाय करतात.

काही जण या दिवसांमध्ये स्वत:ला तंदूरूस्त ठेवण्यासाठी आल्याचा चहा पितात. हा चहा प्यायल्याने सर्दी-खोकल्यासारख्या समस्याही दूर होतात. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात आल्याचा चहा प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे होऊ शकतात? त्याबद्दल सांगणार आहोत.

Ginger Tea in Monsoon
Tofu Benefits : टोफू आहे सर्वोत्तम सुपरफूड, 'या' कारणांसाठी आहारात जरूर करा समावेश

सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो

पावसाळ्यात काही जणांना ॲलर्जीचा त्रास संभवतो. तसेच, वातावरणातील बदलांमुळे  संसर्गजन्य आजार उद्भवतात. यामध्ये सर्दी-खोकला आणि ताप या समस्यांचा समावेश अधिक असतो.

काहींचे ॲलर्जीमुळे तर काहींचे सर्दीमुळे नाक बंद होते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता. आल्यामध्ये अँटी-मायक्रोबिअल, अँटी-एनाल्जेसिक गुणधर्मांचा समावेश आढळतो. आल्याच्या या गुणधर्मांमुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

पावसाळ्यात आल्याचा चहा प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंन्ट्स आढळतात. तसेच, आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आल्याचा चहा प्यायल्याने व्हायरल इन्फेक्शन टाळता येते. त्यामुळे, विविध संसर्गांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आल्याचा चहा अवश्य प्या.

बुरशीजन्य संसर्गांपासून आराम मिळतो

पावसाळ्यातील दिवसांमध्ये अनेकदा साचलेल्या पाण्याशी आपला संपर्क येतो, किंवा पावसात भिजल्यामुळे पायांमध्ये बुरशीजन्य संसर्ग निर्माण होऊ शकतो. पायाच्या बोटांमध्ये, पायाच्या भेगांमध्ये किंवा नखांमध्य देखील संसर्ग होऊ शकतो.

त्यामुळे, पायाला खाज येणे, पायांमध्ये रॅशेस येणे, आग होणे इत्यादी समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल घातलेला चहा पिऊ शकता. आल्यामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात. या गुणधर्मांमुळे आल्याचा चहा प्यायल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे, आल्याचा चहा अवश्य प्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.