Goosebumps : भीतीने अंगावर काटा का येतो? जाणून घ्या कारण

अंगावर काटा येणं याला इंग्रजीत Goosebumps म्हणतात. ही एक सामान्य प्रतिक्रीया आहे. जो वारसा आपल्याला पूर्वजांकडून मिळाला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही.
Goosebumps
Goosebumpsesakal
Updated on

Goosebumps Facts : जेव्हा तुम्ही एखादा भीतीदायक व्हिडीओ बघतात तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रीया काय असते, अंगावर काटा उभा राहिला. किंवा एखादी भयानक घटना बघितली, आठवली तरी अंगावर काटा आला असं आपण म्हणतो. किंवा अगदी गार वारा सुटला तर अंगावर शहारा येतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या घटना असल्या तरी आपलं शरीर एकसारखी प्रतिक्रीया देतं. असं का, जाणून घेऊया.

Goosebumps
Health Tips: पायात सारखे गोळे येताय? सावधान, 'ही' असू शकतात कारणं

अंगावर काटा येणं म्हणजे काय?

शहारा येणं किंवा काटा येणं या प्रक्रीयेत अंगावरची बारिक लव, केस ताठ उभे राहतात.

असं का होतं?

त्वचेवरच्या बारिक बारिक पेशींच्या आकूंचन, प्रसरणाने शहारे येतात. यात काही पेशी आकुंचित झाल्याने आजूबाजूच्या पेशींमध्ये उठाव येतो. आपल्याला थंडी वाजल्यावरपण असं होतं. असा प्रकार जनावरांच्या बाबतपण घडतो.

Goosebumps
Health Tips : सांधे दुखीचा त्रास आहे? युरिक ॲसिड वाढल्याचा असू शकतो परिणाम

या मागचं शास्त्रिय कारण काय?

शरीरात स्ट्रेस हार्मोन्स म्हणजेच ऐड्रेनलिन हार्मोन सबकाँशियस अवस्थेत रिलीज झाल्यावर शहारे येतात. जनावरांमध्ये हे त्यांना थंडी वाजल्यावर, ताणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यावर रिलीज होतात. तर माणसात हे हार्मोन्स भीती, थंडी, भावनिक झाल्यावर व तणावपूर्ण परिस्थितीत रिलीज होतात.

माणसांमध्ये ऐड्रेनलिन हार्मोन रिलीज झाल्यावर अश्रू निघणं, हाताला घाम फुटणे, छातीचे ठोके वाढणे, हात थरथरणे, ब्लड प्रेशर वाढणे, पोटात गोळा येतो असे बदल बघायला मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.