आजीचा बटवा: आयुर्वेदिक औषधी जायफळाचे काय आहेत फायदे?

जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात.
Nutmeg
NutmegEsakal
Updated on

आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औषधीयुक्त असतं.आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंटचं काम जायफळ करतं. जायफळ अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही परिपूर्ण असतं.

म्हणूनच डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात जायफळचा वापर केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो. सोबतच पचनक्रियेशी संबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं. तर जाणून घ्या जायफळचे औषधीय गुण...

Nutmeg
आजीचा बटवा: बडीशेपचा जोडीदार असलेल्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

हृदयाचं आरोग्य राहतं उत्तम.

जायफळचा व्यवस्थित डोस घेतल्यास हृदयविकारांपासून आपण बचाव करू शकतो. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरतं.

Nutmeg
Recipe: घरच्या घरी सीताफळ रबडी कशी तयार करायची ?

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणणं.

जायफळच्या अर्कामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि स्वादुपिंडाचं काम वाढवतं.

मूड स्विंग उत्तम करतं.

जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्याचं ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं.

Nutmeg
आजीचा बटवा: गणपतीच्या पूजेत लागणाऱ्या 21 पत्री वाहण्यामागचे शास्र

डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फायदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग खाण्यात करणं आवश्यक आहे.

Nutmeg
आजीचा बटवा : दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या

पाचनक्रियेसाठी फायदेशीर

जायफळ पाचनक्रिया चांगली करतं. दररोज जेवल्यानंतर जायफळ तुकड्याच्या रूपात किंवा पावडर करून त्याचा वापर करावा. पोटाच्या समस्या दुरुस्त करण्यासाठी पाचन क्षमता वाढविण्याचं काम जायफळ करतं.

Nutmeg
आजीचा बटवा: काळे मिरे अनेक आजारावर आहेत रामबाण उपाय

तोंडाची दुर्गंधी होते दूर

जायफळामध्ये तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचेही गुण असतात. अनेक वेळा गळ्याजवळ व्हायरस किंवा बॅक्टेरिया चिटकून राहतात आणि त्यामुळे तोंडाला दुर्गंध येतो. जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होतो.

Nutmeg
आजीचा बटवा: आयुर्वेदात श्रेष्ठ असलेल्या हरडाचे औषधी गुणधर्म कोणते आहेत?

संक्रमणापासून होणारे आजार राहतील दूर जायफळमध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून शरीराचं रक्षण जायफळ करतं. म्हणूनच आपल्या जेवणात, स्वयंपाकात जायफळचा वापर केल्यानं संक्रमण होण्याची शक्यता कमीच असते. एव्हढंच नाही तर जायफळचं पावडर कुठल्याही इंफेक्शनच्या ठिकाणी लावलं तर ती जखम किंवा इंफेक्शन बरं होतं.

Nutmeg
Recipe: घरच्या घरी कशी तयार करायची केळीची कचोरी?

डोळ्यांसाठी फायदेशीर

जायफळमध्ये अँटऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स असतात जे डोळ्यांशी निगडित आजारांवर फायदेशीर ठरतात. डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचं काम जायफळ करतं. जायफळ डोळ्यांचं दुखणं, जळजळ आणि सूज कमी करतं. यासाठी जायफळ पाण्यासोबत उगाळून घ्यावं आणि ते डोळ्यांवर बाहेरून लावावं. लक्षात ठेवा डोळ्याच्या आत ही पेस्ट जाता कामा नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com