Hair Care Tips: नखं एकमेकांवर घासल्याने खरंच केस लवकर वाढतात का?

प्रत्येकजण केसांसाठी असा प्रयोग नक्कीच करत असेल. पण त्यामागचं विज्ञान काय आहे?
Hair Health
Hair HealthSakal
Updated on

केसांच्या वाढीबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. नखं घासल्याने केस लवकर वाढतात, असं आपण प्रत्येकानेच लहानपणापासून ऐकलं असेल. अनेकजण असे प्रयोगही सतत करत असतात. पण यामागे काही सत्य आहे का? (Hair Care Tips)

समज काय आहे?

बऱ्याच लोकांना असं वाटतं की नखं एकमेकांवर घासल्याने काही दबाव बिंदू सक्रिय होतात. रक्ताभिसरण चांगलं होतं आणि केसांच्या मुळाला चांगला रक्तपुरवठा होतो. त्यामुळे केस लवकर वाढतात आणि निरोगी होतात.

 विज्ञान काय सांगतं?

या दाव्याचं समर्थन करण्यासाठी वैज्ञानिक पुरावे अपुरे आहेत. केसांच्या वाढीवर कोणत्याही बाह्य गोष्टीपेक्षा आनुवंशिकता, हार्मोन्स आणि एकूण आरोग्य यांचा प्रभाव असतो. टाळूला मसाज केल्याने रक्तप्रवाह काही प्रमाणात सुधारतो. पण केसांच्या वाढीवर त्याचा थेट परिणाम कमी प्रमाणात होतो. (Hair Hacks)

Hair Health
Hair Care: केस खूप गळतात, हैराण आहात? रोज करा ही योगासनं, गळती थांबून केस होतील दाट

 केसांच्या वाढीचं चक्र कसं असतं?

केसांच्या वाढीची (Hair Growth) एक टाईमलाईन असते. काही काळ ते वेगाने वाढतात. तर काही काळ ते अजिबात वाढत नाहीत, किंवा हळू वाढतात. यासाठी अनेक अंतर्गत घटक कारणीभूत असतात. केसांची निगा आपण कशी राखतो, तसंच एकूण आरोग्य कसं आहे, असे बाह्य घटक केसांच्या वाढीवर अप्रत्यक्षपणे परिणाम करू शकतात. पण केवळ नखं घासल्याने फारसा परिणाम होतो, असं काही आढळून आलेलं नाही.

Hair Health
Ritha Use For Hair : केसांना लांब आणि चमकदार बनवण्यासाठी महागडे तेल शाम्पू नाहीतर रिठा लावा, फरक अनुभवा!

मग केसांच्या वाढीसाठी काय करायचं?

  • संतुलित आहार राखणे

  • केस स्वच्छ ठेवणे

  • जास्त हीट वापरून हेअरस्टाईल करणे टाळावे.

  • केसांवर जास्त केमिकल्स वापरू नये.

  • तणावाचं व्यवस्थापन करणे.

  • केसांच्या आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे.

Hair Health
Hair Fall : पातळ केसांचा वैताग आलाय? या 5 गोष्टी लावल्याने पुन्हा सुरू होईल केसांची वाढ

केसांची वाढ ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यावर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. त्यामुळे बाह्य उपायांच्या मागे जास्त लागण्यापेक्षा केसांची काळजी घेण्याच्या सर्वांगीण पद्धतींवर लक्ष केंद्रित करणे, निरोगी जीवनशैली राखणे आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणे, अशा गोष्टी केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि वाढीस हातभार लावू शकतात.

 टीप – वरील माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.