Foods For Hairs : पावसाळा सुरू झाला की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. परंतु, या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच, त्वचा आणि केसांची योग्य प्रकारे काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण, या दिवसांमध्ये वातावरणातील आर्द्रतेचा परिणाम हा केसांवर आणि त्वचेवर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे, केस कमजोर होतात आणि केस मोठ्या प्रमाणात गळतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी मग विविध उपायांचा अवलंब केला जातो.