Health Tips : हे ५ उपाय करा आणि विसराळूपणा विसरा

तुम्ही सतत काही विसरता का, लहान-मोठ्या गोष्टी विसरल्याने अडचणींचा सामना करावा लागतो का? याचे उत्तर होकारार्थी असेल तर हे उपाय नक्की करून बघा.
Health Tips : हे ५ उपाय करा आणि विसराळूपणा विसरा
Updated on

काही लोकांना नको नको ते सगळे लक्षात राहते, पण काही लोकांना मात्र लहानसहान गोष्टी विसरण्याची सवय असते. त्यामुळे नातेसंबंधात, घरात, कामाच्या ठिकाणी अनेक गोंधळ होऊ शकतात. एखादी वस्तू, काम, एखादी महत्वाची गोष्टी विसरणे असे अनेक प्रकार असतात. यामुळे आपले नुकसान होऊ शकते. पण यावर काय करावे हे काही केल्या समजत नाही. वय झाले की, विसरणे हे समजून घेतले जाते पण तरूण वयातही अनेक गोष्टी विसरणारे आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात.

Health Tips : हे ५ उपाय करा आणि विसराळूपणा विसरा
Mental Health: टीनेजमधल्या 'या' चुकीच्या सवयींमुळे येईल डिप्रेशन; मुलांनो, वेळीच सावध व्हा!

यावर आपण असे काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे विसराळूपणा कमी होण्यास मदत

उलटे चाला

उलटे चालणे हा विसराळूपणावरचा एक उत्तम उपाय ठरू शकतो. यामागचे नेमके कारण काय ते अद्याप न्यूरोसायन्सचा अभ्यास कऱणाऱ्यांनाही सापडलेले नाही. पण लंडनमधील एका विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार उलटे चालल्यामुळे व्यक्तींचा विसराळूपणा कमी होतो हे सिद्ध करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या अभ्यासात उलटे चालणाऱ्या व्यक्तींना पूर्वी पाहिलेले चित्रपट, चित्रे, शब्द जास्त चांगले आठवत असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

Health Tips : हे ५ उपाय करा आणि विसराळूपणा विसरा
Better Mental Health : उत्तम मानसिक आरोग्यासाठी 'हे' पदार्थ खा

भाज्या आणि फळे खाणे वाढवा

एका सर्वेक्षणानुसार, आपला आहार आणि आपली स्मरणशक्ती यांचा एकमेकांशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. जास्त प्रमाणात भाज्या आणि फळे खाल्ल्यास विसराळूपणा कमी होण्यास उपयोग होतो. यामध्ये हिरव्या, लाल, केशरी अशा सगळ्या रंगांची फळे असायला हवीत. तसेच सॅलेड, पालेभाज्या, फळभाज्या अशा सगळ्या भाज्यांचाही समावेश होतो. हे सगळे उतारवयात तर खायला हवे पण तरुण वयात याचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असायला हवा.

Health Tips : हे ५ उपाय करा आणि विसराळूपणा विसरा
Health Tips : डोक्यातले विचार थांबतच नाही? ४ उपाय डोकं शांत

प्रकाशात काम करणे

अनेकदा आपण कमी प्रकाशात राहतो आणि काम करतो, पण याचा आपल्या स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होऊ शकतो. मिशीगन विद्यापीठात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार प्रकाशात काम केलेल्या लोकांची स्मरणशक्ती अंधारात राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्यांपेक्षा जास्त असते. प्रकाशाचा आपल्या मेंदूच्या ठेवणीवर थेट परिणाम होत असल्याने चांगल्या स्मरणशक्तीसाठी प्रकाशात राहणे केव्हाही चांगले.

Health Tips : हे ५ उपाय करा आणि विसराळूपणा विसरा
Mental Health Care : नववर्षात करूया मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प

इंटरमिटंट फास्टींग

सतत जास्त प्रमाणात खाल्ल्याने मेंदूला चालना मिळण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे लहानसहान गोष्टी विसरण्याचे प्रमाण वाढते. लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार काही विशिष्ट प्रकारचे उपवास केले तर स्मरणशक्ती चांगली राहते. त्यामुळे ज्यांना सतत विसरण्याचा त्रास आहे त्यांनी थोडे कमी खावे आणि ठराविका काळाने झेपतील तेवढे उपवास करावे.

Health Tips : हे ५ उपाय करा आणि विसराळूपणा विसरा
World Mental Health Day 2021 - कुशाग्र बुद्धीसाठी हे पदार्थ खा

काळजी करू नका

विसरणे हे आपला मेंदू जागृत असण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला विसरभोळेपणाचा त्रास असेल तर अजिबात काळजी करु नका. विसरणे म्हणजे तुमचे वय झाले किंवा तुम्हाला मेमरी लॉस झाला असे नाही. माणसाचा मेंदू हे शास्त्रज्ञांसाठी आजही कोडे आहे आणि त्यातील स्मरणशक्ती ही आपल्याला मिळालेली देण असल्याने थोडेफार विसरलो तरी काळजी करण्याचे कारण नाही.

Health Tips : हे ५ उपाय करा आणि विसराळूपणा विसरा
Mental health: 'अति विचार टाळून नॉर्मल रहा'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.