Fitness Tips: धावपळीच्या जगात निरोगी आयुष्य जगण्यासाठी 'या' टिप्स नक्की फॉलो करा

जर दिवसाची सुरुवातच चुकीची झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो.
Fitness Tips
Fitness Tipssakal
Updated on

तुमची सकाळ जर चांगली गेली तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो असे अनेकदा म्हटले जाते. जर तुमच्या दिवसाची सुरुवात चुकीची झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. यासाठीच शरीर प्रसन्न करण्यासाठी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुमच्या दिनक्रमात काही बदल करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या दिनक्रमात काही गोष्टी टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुमची सकाळ प्रसन्न होईल. या सवयी कोणत्या आहेत. ते जाणून घ्या.

आजकालच्या धावपळीच्या जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे साधे आणि संतुलित आयुष्य असं म्हणायला काही हरकत नाही, हे जरी कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही. पण काही छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या रूटीनचा भाग केल्याने आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.

Fitness Tips
Independence Day 2023: स्वातंत्र्य दिवसाच्या 'अशा' द्या खास शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

निरोगी आयुष्यासाठी काही टिप्स

१. शक्यतोवर आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवा. आपल घर, ऑफिसचा डेस्क, गाडीची डिक्की, बॅग या गोष्टी व्यवस्थित आवरून ठेवा. अस्थाव्यस्थ ठेवल्याने त्याचा आपल्याला त्रासही होतो आणि चिडचिड देखील वाढते.

२. आपले विचार आणि दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि प्रगतशील ठेवा. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून जरा दूर रहा.

३. रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.

४. रोज थोडा का होईना पण व्यायाम करा आणि संतुलित नाश्ता करा.

५. ऑफिसची काम, तिथला स्ट्रेस कामाचं टेन्शन घरी आणू नका, घरी आपल्यावर आपल्या कुटुंबासोबत जगा.

६. रोजच्या रोज आपली टू-डू लिस्ट लिहीत चला, म्हणजे दिवसभरात काय काय करायचं आहे हे लक्षात असेल.

७. जेवण नेहमी आरामात आणि चावून चावून खा, ते तुमच्या आरोग्यासाठी आणि पचनशक्तीसाठी चांगले ठरेल.

८.वाचनाची सवय वाढवा म्हणजे दररोज एक चांगले पुस्तक, चांगले साहित्य वाचा. यामुळे तुमचे ज्ञान तर वाढेलच, पण हे तुम्हाला सकारात्मक बनवून तुमची सर्जनशीलताही वाढेल.

९. वर्तमानपत्र वाचा किंवा बातम्या पहा, जेणेकरून तुमची माहिती अपडेट होईल.

१०. बसताना, लक्षात ठेवा की पाय क्रॉस करून बसू नका, यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी याशिवाय वैरिकास व्हेन्स आणि स्पायडर व्हेन्स होतात.

Fitness Tips
Women's Fashion Tips: पन्नाशीनंतरही माधूरीसारखं दिसायचंय स्टायलिश? मग या टिप्स नक्की फॉलो करून पाहा

११. तुम्ही गुडघ्याऐवजी तुमचे घोटे क्रॉस करून बसलेत तर बरे होईल.

१२. खूप जास्त उंच हिल्स घालू नका. 2 इंचापेक्षा जास्त उंच हिल्स घालणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

१३. सतत कॉम्पुटर वर काम करू नका, त्याचा परिणाम डोळे, खांदे आणि मानेवर होतो. थोड्या थोड्यावेळाने ब्रेक घ्या. काही वेळ डोळे बंद करा आणि आराम करा.

१४. नेहमी तुमच्या मोबाईलवर व्यस्त राहू नका. जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा फिरायला जाल तेव्हा मोबाईल बंद करणे चांगले.

१५. स्वच्छतेची काळजी घ्या. बाहेरच्या स्वच्छतेपासून ते वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत, कारण हे केवळ तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठीच नाही तर उत्तम आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.