विकास सिंह,
संस्थापक, फिटपेज ॲप
किपफिट
वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरा आणि चवींचा देश असलेल्या भारतामध्ये आंबलेल्या खाद्यपदार्थांचा समृद्ध इतिहास आहे. दक्षिणेकडील तिखट ‘डोसा’ ते उत्तरेकडील मसालेदार ‘लोणच्या’पर्यंत, आंबवलेले पदार्थ हे शतकानुशतके भारतीय आहाराचा अविभाज्य भाग आहेत. हे स्वादिष्ट पदार्थ फक्त चवीपेक्षा बरंच काही देतात.
किण्वन म्हणजे नक्की काय?
काही फळे जास्त काळ ठेवल्यास ते खराब होऊ लागतात. परंतु काहीवेळा, योग्य मार्गाने केले तर, हे ‘वाईट होणे’ नियंत्रित केले जाऊ शकते आणि काहीतरी चविष्ट त्यातून मिळू शकते. सोप्या भाषेत ते किण्वन आहे. अशी प्रक्रिया ज्यामध्ये जिवाणू किंवा यीस्टसारखे सूक्ष्मजीव अशा प्रकारे विघटन करतात की ते टिकवून ठेवण्याबरोबर पोषणदेखील वाढवते.
आंबवलेले पदार्थांचे वेगळेपण
नैसर्गिक संरक्षण - आपल्या पूर्वजांनी अन्नपदार्थ आंबवायला सुरुवात केली याचे पहिले कारण म्हणजे ते जास्त काळ ताजे ठेवणे. रेफ्रिजरेटरशिवाय, त्यांनी शोधून काढले की किण्वन हानिकारक जिवाणूंपासून अन्नांचे संरक्षण करू शकते आणि त्यांचे शेल्फ लाइफ वाढवू शकते. मग आजीच्या घरी ते तिखट लोणचं? हे अनेक महिन्यांपासून सुरक्षित आणि स्वादिष्ट आहे, ते किण्वन मुळेच.
पौष्टिक वाढ : पदार्थ आंबतात तेव्हा त्यांच्यात जादूई परिवर्तन होते. सूक्ष्मजीव कामाला लागतात आणि जटिल पोषक घटकांचे तुकडे करतात, ज्यामुळे ते आपल्या शरीराला शोषून घेणे सोपे होते. इडली आणि डोसा यांचे पीठ आंबवल्यावर जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे बाहेर पडतात. केवळ आंबलेल्या पदार्थांची चवच वेगळी नसते, तर ते अनेकदा त्यांच्या न आंबलेल्या अन्नपदार्थांपेक्षा जास्त पौष्टिक मूल्य देतात.
आतड्यांचे आरोग्य : आपल्या पोटातील चांगले बॅक्टेरिया अन्न पचवण्यास मदत करतात. दही किंवा त्यासारखे आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने यातील अधिक अनुकूल जिवाणूंचा परिचय होतो. हे बॅक्टेरिया, ज्याला प्रोबायोटिक्स म्हणतात, ते लहान मदतनिसांसारखे कार्य करतात, अन्न तोडण्यात आणि पोषक द्रव्ये मिळवण्यात मदत करतात. ते पचन सुधारतात, सूज कमी करतात आणि आपली प्रतिकारशक्तीही वाढवतात.
नैसर्गिक प्रोबायोटिक्स : प्रोबायोटिक्स हे आपल्या शरीरासाठी आरोग्य योद्धासारखे असतात. आंबवलेले पदार्थ हे त्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. या नैसर्गिक प्रोबायोटिक्सचे सेवन केल्याने संतुलित अंतर्गत परिसंस्था राखण्यात, चांगले पचन वाढण्यास आणि एकूणच आरोग्यास समर्थन देण्यास मदत होते.
रोगांशी लढा : नियमितपणे आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयाच्या समस्या कमी होतात. किण्वन प्रक्रियेमुळे संयुगे तयार होतात ज्यात दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ते रोग प्रतिबंधक भूमिका बजावतात.
आवडते आंबवलेले पदार्थ
दही : अनेक घरांमध्ये रोजचा मुख्य पदार्थ, ‘दही’ हा फक्त थंडावा देणारा साइड डिश नाही. हे प्रोबायोटिक्सने भरलेले आहे. ते पचनास मदत करतात आणि आतडे मजबूत करतात.
इडली आणि डोसा : आंबलेल्या तांदूळ आणि मसूरच्या पिठापासून बनवले जातात. ते प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचे समृद्ध स्रोत आहेत.
लोणचे : प्रत्येक भारतीय घरात घरगुती लोणच्याची बरणी असते. विविध भाज्या आणि फळांपासून बनविलेले, ते परिपूर्णतेसाठी आंबवले जातात.
ढोकळा : हलका, पौष्टिक आणि पटकन खाण्यासाठी योग्य आहे.
आंबवलेले पदार्थ हे केवळ चविष्ट पदार्थ नसून ते भारताच्या प्राचीन शहाणपणाचा पुरावा आहेत. चव आणि आरोग्य फायद्यांचे मिश्रण देत असून आधुनिक विज्ञान हल्ली पूर्णपणे समजू लागले आहे. किण्वनाची जादू, आपल्या पूर्वजांकडून मिळालेली भेट स्वीकारा आणि प्रत्येक घासात परंपरा व आरोग्याचा आनंद घ्या!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.