शरीरातील साखरेची पातळी राहील नियंत्रित; खजूर खाल्ल्याने होणार फायदे, पहा..

खजूरात आरोग्य फायदे असल्याने त्याचा आहारातही समावेश केला जातो.
खजूर
खजूर
Updated on

खजूर फक्त मिठाई किंवा गोड पदार्थ म्हणून खाल्ला जातो असे नाही तर, अनेक पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठीही खजूराचा वापर केला जातो. खजूरात आरोग्य फायदे असल्याने त्याचा आहारातही समावेश केला जातो. एका खजूरात जवळपास (8 ग्रॅम) 23 कॅलरीज, 0.2 ग्रॅम प्रथिने, 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 0 ग्रॅम फॅट असते. खजूर पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहाचा चांगला स्रोत आहे.

एका खजूरमध्ये 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, जे साखरेचेही प्रमाण वाढवण्याचे काम करतात. खजूर गोड लागतात कारण त्यामध्ये फ्रक्टोज जास्त असते. जे ग्लुकोजपेक्षा दुप्पट गोड असते. सरासरी खजूरमध्ये फक्त अर्धा ग्रॅम फायबर असते. जसजसे ते पिकत जाईल तसे साखरेचे प्रमाण वाढत जाते आणि फायबर कमी होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, खजूर इतके गोड असूनही त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे.

कर्करोग प्रतिबंध

खजूरमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्याचा कर्करोग प्रतिबंधाशी संबंध जोडला जातो. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर आइस्क्रीम किंवा मिठाई खाण्याऐवजी खजूर खावे. हे आरोग्याला फायद्याचे आहेच शिवाय त्याचा शरीरावरही चांगला पिरणाम होतो.

खजूर
Share Market : येत्या सहा महिन्यात 'हे' शेअर्स देतील दमदार परतावा; तज्ज्ञांचा सल्ला

उच्च रक्तदाब नियंत्रित करते

खजूरही पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीसाठी आवश्यक इलेक्ट्रोलाइट यामध्ये असते. पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. खजूरमध्ये सोडियमचे प्रमाणही कमी असते आणि त्यामुळे काही प्रमाणात फायबर मिळते. हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठी खजूर खाणे महत्त्वाचे आहे.

हाडे मजबूत करते

खजूरमध्ये मॅग्नेशियम असते, जे हाडांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे असते. मॅग्नेशियमची कमतरता ऑस्टियोपोरोसिसच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहे. याशिवाय यामध्ये कॅल्शियम आणि लोहही आढळते.

रजोनिवृत्तीच्या समस्या दूर करण्यात प्रभावी

खजूरमध्ये आयसोफ्लाव्होनचे प्रमाण सर्वाधिक असते. रजोनिवृत्तीची लक्षणे जसे की ओटीपोटात दुखणे, हात-पायांवर सूज येणे यापासून मुक्त होण्यासाठी खजूर खूप फायदेशीर आहेत.

खजूर
माजी सैनिकाचा नादखुळा! बांबू शेतीतून पिकवले पडीक जमिनीवर सोने

साखरेची पातळी नियंत्रित करते

साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जर तुम्हाला साखर सोडायची असेल किंवा गोड खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही आहारात खजूर वापरू शकता. खजूर हा एक पोर्टेबल स्नॅक आहे. जो तुम्ही मिठाई किंवा स्नॅक्सची आवड कमी करण्यासाठी खाऊ शकता. मधुमेहाच्या रुग्णांनी 2-3 पेक्षा जास्त खजूर खाऊ नयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.