Raw Mango Benefits : उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे कैरी, जाणून घ्या गुणकारी फायदे

Raw Mango Benefits : उन्हाळ्यात आंबटगोड कैरी सर्वजण चवीने खातात.
Raw Mango Benefits
Raw Mango Benefitsesakal
Updated on

Raw Mango Benefits : उन्हाळा म्हटल की, सर्वांना चाहूल लागते ती आंब्याची. फळांचा राजा असलेला आंबा याच ऋतूमध्ये भरपूर खाल्ला जातो. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण मिळून आंब्यावर आणि आमरसावर ताव मारतात. पूर्ण आंबा तयार होण्यापूर्वी जो कच्चा आंबा असतो, ज्याला आपण सर्वजण कैरी म्हणून ओळखतो. तो देखील या दिवसांमध्ये चवीने खाल्ला जातो.

कैरीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. यामध्ये कैरीची चटणी, कैरीचे पन्हे, लोणचे, मुरांबा, कैरीचे तिखट-मीठ लावलेले चटपटीत सलाड बनवले जाते. या कैरीच्या आंबटगोड चवीचा आनंद घेतल्याशिवाय आपला उन्हाळा पूर्ण होऊच शकत नाही. असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अशी ही आंबटगोड कैरी आपल्या आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे. आज आपण कैरीचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

Raw Mango Benefits
Green Apple Benefits : हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त आहे हिरवे सफरचंद, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

आतड्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी चे विपुल प्रमाण आढळून येते. जेव्हा आपण कैरीचे सेवन करतो तेव्हा, आतड्यांमध्ये पित्ताचा स्त्राव वाढतो. यामुळे, चरबीचे शोषण वाढते आणि हानिकारक सूक्ष्मजंतू नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे, आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. यकृत आणि आतड्यांसंबंधी समस्या कमी करण्यासाठी कैरी फायदेशीर आहे. (Beneficial for gut health)

डिहायड्रेशनची समस्या दूर होते

उन्हाळ्यात अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. ही समस्या कमी करण्यासाठी भरपूर पाणी पिणे, थंड पेयांचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कैरीची ही मदत घेऊ शकता. कैरीपासून बनवलेले पन्हे प्यायल्याने डिहायड्रेशनपासून आराम मिळतो. उन्हाळ्यासाठी कैरीचे पन्हे हे अतिशय फायदेशीर पेय मानले जाते. (helps to reduce dehydration)

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

कैरीमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. कैरीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. कच्ची कैरी हळद किंवा मीठ लावून खाल्ल्याने ही तोंडाला छान चव येते. कैरीचे सेवन केल्याने शरीरातील जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे, वजन नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो. शिवाय, पोट ही भरलेले राहते. (Useful for weight loss)

Raw Mango Benefits
Benefits Of Watermelon : शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी कलिंगड आहे लाभदायी, जाणून घ्या फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.