Health : मधुमेहींनो बिनधास्त खा ही फळे, नाही वाढणार शुगर

आपले स्वास्थ्य ठीक राहावे म्हणून डॉक्टर आपल्याला रोज ताजी फळं खाण्याचा सल्ला देतात
Health  news
Health newsesakal
Updated on

आपले स्वास्थ्य ठीक राहावे म्हणून डॉक्टर आपल्याला रोज ताजी फळं खाण्याचा सल्ला देतात. पण, डायबिटीस झालेल्या लोकांना आपली साखर कंट्रोल मध्ये रहावी म्हणून आपल्या डाएटवर लक्ष ठेवावं लागतं. फळांमध्ये उपजतच साखर असते, अशा परिस्थितीमध्ये फळे खाणे धोक्याचे वाटते. पण ही फळे तुम्ही डोळे झाकून खाऊ शकतात.

1. किवी

किवीचे फळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. त्यामुळे या सुपरफ्रूटला तुम्ही देखील आपल्या आहारामध्ये समाविष्ट करु शकता.

Health  news
Morning Health Care Tips: सगळे आजार पळतील दूर; फक्त सकाळी उठून करा हा उपाय

2. जांभूळ

जांभूळ हे फळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी अतिशय सर्वोत्तम फळ आहे. हे फळ आपल्या रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत करते. जांभळाच्या बियांची पावडर करुन त्याचे सेवन मधुमेहाचे रुग्ण करु शकतात. या बिया रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित करण्यास प्रभावी आहेत.

Health  news
Peanut For Health: शेंगदाणे खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?

3. पेरू

मधुमेहाला कंट्रोल मध्ये ठेवण्याचं काम पेरू करते आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासावर देखील ते फळ उत्तम आहे. पेरूमध्ये ‘व्हिटॅमिन ए’ आणि ‘व्हिटॅमिन सी’ असते आणि पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. या फळाचा ग्लुकोज इंडेक्सही कमी असतो.

Health  news
Health Tips : आयुर्वेदीक काढा पिणे आरोग्यासाठी धोकादायक? या आजारांना मिळते आमंत्रण

4. बेरी

बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स असतात, त्यामुळे ते तुमच्या शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी, मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात बेरींचा समावेश करू शकतात. जसे की, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी, रास्पबेरी, क्रॅनबेरी, चोकोबेरी इत्यादी.

Health  news
Health: कपडे न घालता झोपण्याचे फायदे माहिती आहेत का?

5. सफरचंद

सफरचंदामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.

Health  news
Health: हिवाळ्यात वजनाच्या समस्येपासून त्रस्त आहात? फॉलो करा 'या' टिप्स

6. अननस

अननस हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर फळ आहे. या फळाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कारण, या फळामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-इंफ्लेमेट्री आदी गुणधर्म असतात.

Health  news
Health Care Tip : सौम्य तापाकडे करू नका दुर्लक्ष ; असू शकते गंभीर आजाराची सुरूवात

7. नाशपती

हे स्वादिष्ट फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेस्ट फळ आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

8. ​संत्री

विटामीन सीचं प्रमाण संत्र्यांमध्ये जास्त असतं. तसंच संत्र्यांमध्ये जीआय इंडेक्सचं प्रमाणही कमी असतं. संत्र्यांमध्ये असणारं पोटॅशिअम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतं यामुळे डायबिटीसचे रुग्ण संत्रीदेखील खाऊ शकतात.

Health  news
Health : खाल्लीत ना भरपूर मिठाई ? आता शरीरावर होतील असे दुष्परिणाम

9. फणस

बाहेरुन काटेरी असणाऱ्या आतून रसाळ असणारे फळ म्हणजे फणस होय. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, थियामिन, रायबोफ्लेविन, नियासिन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅंगनीज आणि मॅंग्नेशिअम सारखे अन्य पोषकतत्वे असतात. हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले आहे. कारण, हे फळ शरीरातील इन्सुलिनच्या पातळीमध्ये सुधारणा करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.