Benefits of Curry Leaves : सकाळी रिकाम्या पोटी खा कढीपत्ता, होतील आश्चर्यकारक फायदे!

आपल्या स्वयंपाक घरामध्ये ज्याप्रमाणे जिरं, मोहरीची फोडणी दिली जाते तसंच कढीपत्त्याची देखील फोडणी दिली जाते. त्यामुळे जेवण जास्त स्वादिष्ट होते आणि चांगली चव येते.चवीबरोबरच आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते खूप महत्त्वाचे आहे.
Curry Leaves
Curry Leavessakal
Updated on

कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी कढीपत्ता वापरला जातो. आपल्या स्वयंपाक घरामध्ये ज्याप्रमाणे जिरं, मोहरीची फोडणी दिली जाते तसंच कढीपत्त्याची देखील फोडणी दिली जाते. त्यामुळे जेवण जास्त स्वादिष्ट होते आणि चांगली चव येते.चवीबरोबरच आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते खूप महत्त्वाचे आहे.

सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केले तर अनेक फायदे होतात. हे यकृताच्या समस्यांवर उपचार करण्यास मदत करते आणि पचनशक्ती मजबूत करते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. सकाळी कढीपत्ता खाल्ल्याने मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत होते. असे केल्याने ओरल हेल्थच्या समस्याही दूर होतात.

सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाण्याचे फायदे

कढीपत्त्यात भरपूर जीवनसत्त्वे असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी2 असतात. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. ज्या लोकांना बद्धकोष्ठता किंवा पोटदुखीचा त्रास आहे त्यांनी अर्धा चमचा कढीपत्त्याच्या रसामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. हे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण राखते.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कढीपत्ता रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. मधुमेहाच्या रुग्णांनी जर ते रोज सकाळी खाल्ले तर ते त्यांच्यासाठी वरदान ठरू शकते. कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे कढीपत्ता खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.

Curry Leaves
Health Care News : 'थायरॉईड' नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे समावेश!

कढीपत्ता केस गळणे थांबवते

यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. डोकेदुखी झाल्यास त्याची पेस्ट कपाळावर लावावी. केसगळती रोखण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. जर कोणाला केस गळण्याची समस्या असेल तर तो त्यापासून हेअर मास्क बनवून लावू शकतो. कढीपत्त्याची पेस्ट त्वचेसाठीही वापरता येते. जर एखाद्याला युरिन इन्फेक्शन असेल तर रोज सकाळी ५ मिली कढीपत्त्याचा रस प्यायल्याने आराम मिळतो.

Related Stories

No stories found.