Health Care News : तुमचेही मनगट सतत दुखते का? मग 'या' व्यायामामुळे मिळेल अराम

ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही आम्ही सांगितलेले व्यायाम करू शकता.
health
healthsakal
Updated on

जास्त वजन उचलणे, हाताच्या साहाय्याने  केलेले व्यायाम आणि लॅपटॉप-मोबाईलचा सतत वापर यामुळे मनगटात दुखणे सामान्य आहे. पण हे जाणून घ्या की हे दुखणे सहजासहजी जात नाही आणि कधी कधी हे दुखणे इतके वाढते की कोणतेही काम नीट करता येत नाही. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही आम्ही सांगितलेले व्यायाम करू शकता.

कोबरा स्ट्रेच

मनगटाचे फ्लेक्सर्स ताणण्यासाठी कोब्रा स्ट्रेच करता येते. कोब्रा स्ट्रेचमुळे कडकपणा कमी होतो. याशिवाय तुमचे शरीरही तंदुरुस्त राहते.

  • कोब्रा स्ट्रेच करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर पोटावर झोपा.

  • तुमचे पाय सरळ आणि खांद्याच्या रेषेत ठेवा. शरीराला आरामदायी स्थितीत ठेवा.

  • दीर्घ श्वास घेत, शरीराचा वरचा भाग वरच्या दिशेने उचला.

  • या दरम्यान, तुमची कोपर शरीराच्या सरळ रेषेत असावी.

  • पाय अशा रीतीने स्ट्रेच करा की तुम्हाला जास्त ताण जाणवणार नाही. डोकं शक्य तितके वर करा.

  • 15-30 सेकंद या स्थितीत राहा. त्यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि सामान्य स्थितीत या आणि हे आसन पुन्हा करा.

health
Health Care News : सांधेदुखीचा त्रास होतोय? मग 'हे' घरगुती पेये ठरू शकतात फायदेशीर

हँडस्टँड स्ट्रेच

जर तुमच्या मनगटात तीव्र वेदना होत असतील तर आम्ही सांगितलेले व्यायाम नक्की करा. हे ब्‍लड सर्कुलेशन आणि लिम्फ फ्लो वाढवून कोर स्‍ट्रेंथ सुधारण्यासाठी ओळखले जाते. हे तुमचे खांदे, हात, कोर आणि पाठीवर परिणाम करते.

फिंगर बेंडिंग स्ट्रेच

हातांसाठी हा एक अतिशय प्रभावी व्यायाम आहे, जो तुम्हाला नियमितपणे केल्याने फायदा होईल. हे केवळ बोटांची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त नाही. हा व्यायाम दिवसातून दोनदा फक्त 5 मिनिटांसाठी करता येतो.

Related Stories

No stories found.