Healthy Soup Recipes: हिवाळ्यात हेल्दी आणि निरोगी राहायचंय? मग या हिरव्या भाज्यांचे सूप जरूर प्या

दुधी भोपळ्याचे सूप पिण्याचे फायदे जाणून घेऊया.
Healthy Soup Recipes: हिवाळ्यात हेल्दी आणि निरोगी राहायचंय? मग या हिरव्या भाज्यांचे सूप जरूर प्या
Updated on

थंडीचा सिझन म्हटला की आपल्याला काहीतरी गरमागरम प्यावेसे वाटते. बाहेर थंडी असताना शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आपण गरम चहा-कॉफी घेत राहतो. पण त्याने शरीराला म्हणावा तितका फायदा होतोच असे नाही.

शरीराला ताकद मिळेल, पोषण मिळेल असे काही डाएटमध्ये समाविष्ट केल्यास त्याने निश्चितच तब्येत चांगली राहण्यास मदत होते. बाजारात हिवाळ्याच्या दिवसांत भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. अशावेळी या भाज्यांचे गरमागरम सूप केल्यास ते तब्येतीसाठी अतिशय उपयुक्त ठरते.

दुधी भोपळा ही एक उत्कृष्ट भाजी आहे जी अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते. यामध्ये प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, सोडियम आणि फायबर आढळतात. याशिवाय यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. जर तुम्ही हिवाळ्याच्या मोसमात दुधी भोपळ्याचे सूप प्यायले तर तुमची आजारी पडण्याची शक्यता खूप कमी होते. दुधी भोपळ्याचे सूप पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

Healthy Soup Recipes: हिवाळ्यात हेल्दी आणि निरोगी राहायचंय? मग या हिरव्या भाज्यांचे सूप जरूर प्या
Black Chana Soup Recipe: घरच्या घरीच खास पद्धतीने बनवा चटकदार गरमागरम काळ्या चण्याचे सूप

भोपळ्याच्या सूपचे फायदे

हिवाळ्यात हे सूप प्यायल्याने तुम्ही दिवसभर हायड्रेटेड राहू शकता. कारण दुधी भोपळ्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. अशा स्थितीत तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होणार नाही आणि तुमचा चेहरा देखील चमकेल.

वजन कमी करण्यात तुम्हाला मदत होऊ शकते. यामध्ये फायबर असते, जे सेवन केल्यावर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. याच्या मदतीने तुम्ही अति खाणे टाळू शकता.

दुधी भोपळ्याचे सूप प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. यामध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीच्या समस्यांपासून आराम मिळतो.

दुधी भोपळा पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत आहे, म्हणून ते रक्तदाब राखण्यास मदत करते.

दुधी भोपळ्याचे सूप हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. याचे सेवन केल्याने बीपी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

दुधी भोपळ्यामधे व्हिटॅमिन सी, लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. अशा स्थितीत त्याचे सूप सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्ताची कमतरता देखील दूर होते.

सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • एक छोटा कांदा बारीक चिरलेला

  • आल्याचा एक तुकडा बारीक चिरलेला

  • 2 ते 4 लसूण - चिरून

  • 2 कप दुधी भोपळ्याचे तुकडे

  • कोथिंबीर - बारीक चिरून

  • पुदिना -10 ते 12

  • 2 कप पाणी

  • जिरे - अर्धा टीस्पून

  • हिंग - एक चिमूटभर

  • काळी मिरी - एक चिमूटभर

  • काळे मीठ - चवीनुसार

  • फोडणीसाठी तूप- १ चमचा

सूप बनवण्याची रेसिपी

  • सर्व प्रथम, कुकर गॅसवर ठेवा आणि गरम होऊ द्या.

  • आता त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल टाका

  • तेल थोडे गरम होऊ द्यावे.

  • आता त्यात बारीक चिरलेला कांदा, आले, लसूण घालून परता.

  • आता त्यात भोपळा, कोथिंबीर, पुदिना आणि 2 कप पाणी घालून पॅक करा.

  • आता कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.

  • आता भोपळा ब्लेंडरमध्ये टाकून त्याची स्मूद पेस्ट बनवा.

  • जिरे आणि हिंग टाका.

  • शेवटी सूपमध्ये काळी मिरी आणि काळे मीठ घाला.

  • कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.