फ्रान्समध्ये जगातील सर्वात घातक संसर्गापैकी एकाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पीडितांच्या डोळ्यांतून रक्त वाहू लागतं. वैज्ञानिकांना भीती आहे की क्रिमियन-कॉंगो रक्तस्रावी फिवर (CCHF) लवकरच ब्रिटनच्या सीमेपर्यंत पोहोचू शकतो. फ्रेंचच्या आरोग्य अधिकार्यांनी सांगितले की, 'हा विषाणू उत्तर-पूर्व स्पेनच्या सीमेला लागून असलेल्या पायरेनीस ओरिएंटेलमध्ये टिक्समध्ये आढळून आला आहे, फ्रान्समध्ये आतापर्यंत संसर्गाची एकही घटना दिसली नाही.'
वैज्ञानिकांनी सांगितले की क्रिमियन-कॉंगो रक्तस्रावी ताप हा टिक-जनित रोग आहे. हे मूलतः आफ्रिका, बाल्कन, मध्य पूर्व आशिया आणि आशियासारख्या उष्ण हवामानाच्या ठिकाणी आढळते. डब्ल्यूएचओने सांगितले की दुर्मिळ असूनही, हा संसर्ग फारच दुर्मीळ असल्याने संसर्ग झालेल्यांपैकी 40 टक्के लोकांची दगावण्याची शक्यता असते.
जुलैमध्ये, ब्रिटिश वैज्ञानिकांनी चेतावणी दिली की हवामान बदलामुळे हा रोग त्याच्या सामान्य क्षेत्राबाहेर आणि युनायटेड किंगडम (यूके) आणि फ्रान्सच्या दिशेने जाऊ शकतो. 2016 ते 2022 दरम्यान स्पेनमध्ये या आजाराची 7 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
कॅम्ब्रिज विद्यापीठामधील पशू चिकित्सा विभागाचे प्रमुख प्राध्यापक जेम्स वूड यांनी वैज्ञानिक बैठकीदरम्यान, किटकांच्या माध्यमातूनच सीसीएचएफचा संसर्ग होतो. हा संसर्ग ब्रिटनपर्यंत पोहोचला आहे. असे सांगितले. 'द सन'शी बोलताना लिव्हरपूर विद्यापीठाचे संसर्ग विभागाचे प्राध्यापक पॉल विगले यांनी जेम्स वूड यांच्या मताशी समहती दर्शवली आहे. ब्रिटनमध्ये भविष्यात हा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं पॉल विगले म्हणाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.