Diabetes Diet: या औषधी वनस्पती मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास करू शकतात मदत

काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो.
Diabetes Diet: या औषधी वनस्पती मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास करू शकतात मदत
Updated on

डायबिटीज हा जगासाठी एक डोकेदुखी ठरला आहे. आज डायबिटीजमुळे जगभरातील मृत्यूची संख्या वाढताना दिसत आहे. डायबिटीज  हा आजार एक चिंतेचे कारण ठरले आहे. जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका जास्त असतो. खरं तर हाय शुगर लेव्हलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या आणि नसा खराब होतात.

आयुर्वेदात अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत, ज्यामुळे डायबेटिजचे लोक हृदयविकारापासून लांब राहू शकतील. डायबेटिज असलेल्या लोकांना (विशेषत: ज्येष्ठ नागरिक) हार्ट डिसीज (हाय कोलेस्टेरॉल, हाय बीपी) होण्याची शक्यता असते. कारण डायबेटिजच्या औषधांमुळे मेटाबॉलिज्म आणि लिव्हरचं काम मंदावतं. अशात काही वनस्पतींमुळे तुमची शुगर कंट्रोल होऊ शकते. ज्याचा फायदा तुम्ही हृदरोगाशी संबंधित आजारापासून लांब राहू शकता.

Diabetes Diet: या औषधी वनस्पती मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास करू शकतात मदत
Health Care News: दररोज सकाळी प्या हे हेल्दी ड्रिंक्स आणि शरीर ठेवा निरोगी; जाणून घ्या हा सर्वोत्तम उपाय

1. पुनर्नवा

तज्ज्ञ सांगतात, पुनर्नवा ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती मूत्रवर्धक असते. यामुळे रक्तातील साखर, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते. या वनस्पतीच्या वापराने लिव्हर, किडनी आणि डोळ्यांचं काम सुधारतं. (डायबेटिक रेटिनोपॅथी, नेफ्रोपॅथी रोखण्यासाठी उपयुक्त). यासोबतच चयापचय क्रियाही सुधारते. दररोज उपाशीपोटी 2-5 ग्रॅम वनस्पतीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

2. सुंठ

ह्रदय आणि चयापचय क्रिया सुधारण्यासाठी सुंठ पावडर घेणं फायदेशीर ठरतं. याच्या वापरामुळे अवयवांवर जी सातत्याने सूज येते, ती कमी होते. तसेच हृदयविकारासह अनेक घातक आजारांचा धोका कमी होतो. दिवसातून एकदा जेवणापूर्वी कोमट पाण्यासोबत ही सुंठ पावडर घेता येते.

3. दालचिनी
घरगुती मसाल्यात दालचिनी असते. ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास आणि Diabetesशी लढा देण्यासाठी दालचिनी इन्सुलिनच्या प्रभावांपैकी एक आहे. ते रक्तातील साखर पेशींमध्ये वाहून नेण्याचा वेग वाढवण्यास मदत करु शकते. हे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवून रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास देखील मदत करु शकते.

4. धण्याच्या बिया
डायबिटीजसाठी धण्याच्या बिया उत्तम आहे. धणे बियाणे शरीरातील  ब्लड शुगर कमी करण्यासाठी जबाबदार एन्झाइमची क्रिया वाढवू शकते. त्यामुळे रक्तातील साखर कणी होण्यास मदत होते.

5. मेथीच्या बिया
मेथीच्या दाण्यांमध्ये एक मुक्त अनैसर्गिक अमीनो आम्ल (4-हायड्रॉक्सीसोसायनेट) असते, जे शरीराच्या स्वादुपिंडाच्या आयलेट पेशींमध्ये ग्लुकोज-उत्तेजित इन्सुलिनचे उत्पादन वाढवते.

6. वेलची

चव आणि सुगंध असलेली वेलची हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासाठी वापरली जाते. यासोबतच वारंवार तहान लागणे यासारख्या मधुमेहाच्या लक्षणांपासून मुक्ती देण्याचं काम करते.

तुम्ही वेलची पूड एकतर चहात टाकू शकता किंवा मग 1 वेलचीची पूड जेवणानंतर 1 तासाने कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.