Food Poisoning : फूड पॉयझनिंग कशामुळे होतं आणि काय आहेत लक्षणे? जाणून घ्या

अन्नातून विषबाध झाल्यास वेळीच उपचार करणे गरजेच आहे नाही तर, याचा घातक परिणाम होऊ शकतो.
Food Poisoning
Food Poisoningsakal
Updated on

उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्न विषबाधा होणे एक सामान्य समस्या आहे. दरवर्षी लाखो लोक याला बळी पडतात आणि अनेकांची स्थिती अत्यंत गंभीर बनते. अन्न विषबाधाची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या.

अन्न कधी खराब होते?

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते तेव्हा बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ सुरू होते. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की 37 अंशांपेक्षा जास्त तापमान बॅक्टेरिया किंवा बुरशीसाठी खूप अनुकूल असते. या कारणास्तव, गरम हवामानात अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त ताजे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.

अन्न विषबाधाची लक्षणे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही खाल्ल्यानंतर पोटात तीव्र वेदना, उलट्या आणि जुलाब, डोकेदुखी, थकवा आणि अशक्तपणा, ताप, ही फूड पॉयझनिंगची लक्षणे असू शकतात. हे कोणत्याही वयात घडू शकत असले तरी ही समस्या लहान मुलांमध्ये अधिक आढळते.

Food Poisoning
Health Care Tips : घराच्या घरी व्यायाम करा अन् मधुमेहावर नियंत्रण मिळवा! जाणून घ्या

अन्न विषबाधा झाल्यास काय करावे

1. शरीरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी नारळ पाणी, ग्लुकोज, इलेक्ट्रोलाइट पावडर आणि लिंबू पाणी प्या.

2. फक्त हलके अन्न खा.

3. केळ्यामध्ये पोटॅशियम असते, त्यामुळे डायरियापासून आराम मिळतो.

4. आल्याचा रस पाण्यात टाकून घ्या, यामुळे पोटदुखीपासून आराम मिळेल.

5. जिरे भाजून, बारीक करून ते दही, ताक किंवा रायतामध्ये मिसळून प्या.

6. पुदीना वापरा.

7. दूध आणि मांसाहार टाळा.

8. उन्हाळा आणि पावसाळ्यात शिळं अन्न खाणं टाळा आणि शक्यतो बाहेरचे अन्न खाऊ नका. त्यापेक्षा घरी शिजवलेले अन्न खा.

अन्नातून विषबाधा किती दिवसात होते?

अन्न विषबाधा झाल्यावर लगेच त्याचा परिणाम दिसत नाही. तुम्ही आता काहीतरी चुकीचे खाल्ले आहे आणि लगेच तुम्हाला विषबाधेची लक्षणे दिसू लागतील असे होत नाही. याची लक्षणे काही दिवसानंतर दिसू लागतात. हे तुम्ही कोणते अन्न खाल्ल्याने ही समस्या उद्भवली आहे यावर अवलंबून आहे. कारण सर्व खाद्यपदार्थांमध्ये विविध प्रकारचे जीवाणू तयार होतात, ज्याचा परिणाम 12 तासांपासून ते 70 दिवसांनंतर होऊ शकतो.

Chitra kode:

Related Stories

No stories found.