हसणे हे सर्वोत्तम औषध मानले जाते. जीवनात तुम्ही जितके जास्त हसाल तितके तुमचे हृदय अधिक तंदुरुस्त आणि निरोगी असेल. असाच एक अभ्यास समोर आला आहे. ज्यामध्ये मोकळेपणाने हसणे हे औषधापेक्षा कमी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आरोग्याच्या मोठ्या समस्या क्षणार्धात दूर होतात.
नुकत्याच झालेल्या या अभ्यासाच्या अहवालात असे सांगण्यात आले की हसण्याने हृदयविकाराचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो आणि हृदय निरोगी राहते. मोकळेपणाने हसल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाचे कार्य चांगले होते.
संशोधन काय सांगते
संशोधकांनी 64 वर्षे वयाच्या 26 लोकांचा अभ्यास केला. या पार्टिसिपेंट्सला दोन गटात विभागले गेले. सर्व सहभागी हे कोरोनरी आर्टरी डिसीजचे रुग्ण होते. त्यांच्यावर १२ आठवडे संशोधन सुरू होते. एका गटाने 12 आठवडे म्हणजे तीन महिने कॉमेडी शो पाहिला आणि दुसऱ्या गटाने तेवढाच वेळ एक सीरियस डॉक्यूमेंट्री पाहिली.
यानंतर, कॉमेडी शो पाहणाऱ्या रुग्णांच्या हृदयाचे कार्य त्यांच्या हसण्यामुळे लक्षणीयरीत्या सुधारल्याचे दिसून आले. डॉक्युमेंटरी पाहणाऱ्यांच्या तुलनेत त्यांच्या हृदयाच्या कार्यामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली होती. कॉमेडी शो पाहणाऱ्या ग्रुपमध्येही शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा अधिक प्रमाणात दिसून आला.
संशोधक काय म्हणतात
संशोधक म्हणतात की, कोरोनरी आर्टरी डिसीजचे रुग्ण नेहमीच हॉस्पिटलमध्ये येत असतात. त्यांच्यामध्ये जळजळ आणि बायोमार्कर आढळतात. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होतो, ज्यामुळे नंतर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होऊ शकतो.
अशा परिस्थितीत हॉस्पिटलमधील रुग्णांना कॉमेडी शो दाखवण्याबरोबरच लाफ्टर थेरपी किंवा आनंदी राहण्याच्या इतर पद्धती समजावून सांगितल्या तर बरीच सुधारणा दिसून येईल.
कारण आनंदी राहणे किंवा मोकळेपणाने हसणे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. म्हणूनच प्रत्येकाने रुग्णासोबत बसून त्याच्याशी मोकळेपणाने बोलले पाहिजे आणि हसले देखील पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.