Health Care News : सांधेदुखीचा त्रास होतोय? मग 'हे' घरगुती पेये ठरू शकतात फायदेशीर

हे पेय कसे बनवले जाते आणि ते हाडांच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.
health care
health caresakal
Updated on

आजकाल हाडांशी संबंधित समस्या सर्वांनाच सतावत आहेत. पूर्वी सांधेदुखीचा त्रास वृद्धांना होत असे, परंतु चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे आज तरुणांनाही सांधेदुखीचा त्रास होतो. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की चालणे किंवा कोणतेही काम करणे कठीण होते.

जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल आणि त्यातून आराम हवा असेल तर तुम्ही तुमच्या आहारात तूप आणि हळदीच्या पाण्याचा समावेश करा. तुम्हाला हे मिश्रण विचित्र वाटेल पण हाडांच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर ठरते. हे पेय कसे बनवले जाते आणि ते हाडांच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.

लागणारे साहित्य

  • गरम पाणी - 1 ग्लास

  • अर्धा टीस्पून हळद

  • अर्धा चमचा गाईचे तूप

health care
Yoga Poses For Neck Pain: फोनच्या अतिवापरामुळे मान दुखतेय? मग, करा 'हे' सोपे व्यायाम

बनवण्याची पद्धत

  • हे करण्यासाठी, प्रथम पाणी गरम करा आणि ते एका ग्लासमध्ये काढा.

  • आता त्यात हळद आणि तूप घालून नीट मिक्स करा.

  • तुमचे हेल्दी ड्रिंक तयार आहे, हळूहळू प्या.

हळद आणि तुपाचे पेय पिण्याचे फायदे

तज्ज्ञांच्या मते, रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप आणि हळदीचे पाणी प्यायल्याने सांधेदुखीपासून खूप आराम मिळतो. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे जळजळ दूर होते, लवचिकता सुधारते. तूप हे व्हिटॅमिन डीचा उत्कृष्ट स्रोत आहे ज्यामुळे कॅल्शियमचे शोषण वाढते.

Related Stories

No stories found.