Cancer: भारतात कर्करोगग्रस्त ६० टक्के मुलांना कुपोषणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कर्करोगावरील केमोथेरपी आणि इतर औषधांचा सामना करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कर्करोगग्रस्त मुलांच्या काळजीसाठी पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. चांगला, पोषक आहार मिळाल्यास त्यांना कर्करोगाच्या विरोधात लढण्याची ताकद मिळेल, असा विश्वास कडल्स फाउंडेशनच्या अहवालातून व्यक्त करण्यात आला.