Health Care News : 'थायरॉईड' नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे समावेश!

थायरॉईडपासून बचाव करायचा असेल तर या आजाराची लक्षणे समजून घ्या आणि काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा.
thyroid
thyroid sakal
Updated on

थायरॉईडची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे हे थायरॉईडचे प्रमुख लक्षण मानले जाते. पण याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. थायरॉईडमुळे तणाव, झोप न येणे, चिंता या सारखे लक्षणं देखील दिसतात.

थायरॉईड हा अनुवांशिकता, हार्मोनल असंतुलन, आयोडीनची कमतरता किंवा तणाव यांसह अनेक कारणांमुळे होऊ शकतो. थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थायरॉईड या आजाराला नियंत्रित करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. जाणून घेऊया काही असे पदार्थ जे थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहेत.

thyroid
Health Care In Monsoon : पावसात कितीही भिजलात तरी तुम्ही आजारी पडणार नाही, फक्त 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये हे बदल करा

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला थायरॉईड असेल तर तुमच्या खाण्याच्या सवयी बदलल्यास तुम्हाला खूप मदत होऊ शकते.

थायरॉईडच्या रुग्णांनी गव्हाऐवजी ज्वारीची भाकरी खावी.

चिप्स आणि बिस्किटे यांसारख्या पदार्थांऐवजी मखाना, नारळ, नट्स आणि फळं खा.

थायरॉईडच्या काळात कधीही खाणे टाळा. खाण्याची योग्य वेळ ठरवणे फार महत्वाचे आहे.

सकाळी 8 च्या आधी नाश्ता करा. दुपारचे जेवण 12-2 च्या दरम्यान आणि रात्रीचे जेवण 7-8 च्या दरम्यान करा.

थायरॉईडच्या रुग्णांनी नारळाचे सेवन केल्यास चयापचय क्रिया वाढेल, तसेच थायरॉइडच्या समस्येपासून सुटका मिळेल.

ज्येष्ठमधामध्ये ट्रायटरपेनॉइड ग्लायसिररेटिनिक अ‍ॅसिडअसते, जे थायरॉईड कर्करोगाच्या पेशी नष्ट करते, तसेच ते नियंत्रित करते.

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद थायरॉईडच्या रुग्णांसाठी खूप गुणकारी आहे. हळदीसोबत दुधाचे सेवन केल्याने थायरॉईड नियंत्रण राहते, तसेच अनेक आजारांवर उपचार होतात. रोज झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात हळद टाकून प्या.

मशरूम थायरॉईडच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहेत. वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच मशरूम थायरॉईड देखील नियंत्रित करते.

Related Stories

No stories found.