Health Care News : वजन कमी करण्यासोबतच बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आहारात दह्याचा अशा प्रकारे करा समावेश...

लठ्ठपणा आणि बद्धकोष्ठता यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही दही ओट्सची रेसिपी करून पाहा. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी आणि त्याचे फायदे.
health care
health caresakal
Updated on

वाढते वजन आणि बद्धकोष्ठता ही आजकालची सर्वात मोठी समस्या आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे दोन्ही समस्या उद्भवतात. त्यामुळे यावर मात करण्यासाठी काही खाद्यपदार्थांचाही वापर करता येईल. टेस्टी आणि हेल्दी खाल्ल्याने या दोन्ही समस्यांमध्ये तुम्ही चांगले परिणाम मिळवू शकता. लठ्ठपणा आणि बद्धकोष्ठता यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही दही ओट्सची रेसिपी करून पाहा. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी आणि त्याचे फायदे.

ओट्स दही वजन कमी करण्यासोबतच बद्धकोष्ठता दूर करते

  • ओट्स - 2 चमचे

  • दही वाटी

  • एक कप पाणी

  • शेंगदाणे - 5 ते 10

  • एक चमचा तूप

  • कोथिंबीर

  • मोहरी

  • कढीपत्ता

  • गाजर - बारीक चिरून

health care
Health Care News : पावसाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी हे 'हेल्दी ड्रिंक्स' नक्की करा ट्राय...

बनवण्याची पद्धत

  • सर्व प्रथम एका भांड्यात ओट्स टाका, त्यात 1 कप दही घाला.

  • या दोन्ही मिश्रणात एक कप पाणी मिसळा आणि रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.

  • सकाळी गॅसवर कढई ठेवा, त्यात तूप घाला.

  • तूप थोडे गरम झाल्यावर त्यात शेंगदाणे, मोहरी, कढीपत्ता, गाजर घालून भाजून घ्या.

  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात थोडे मीठही घालू शकता.

  • तुमचे हेल्दी ओट्स दही तयार आहे.

ओट्स दही कसे फायदेशीर आहे?

ओट्स आणि दही खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कॅलरी जलद बर्न होतात. यामुळे तुम्हाला जास्त वेळ काहीही खावेसे वाटत नाही. ओट्समध्ये मुबलक प्रमाणात असलेले बीटा ग्लूकॉन आतडे स्वच्छ करते. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Shabda kode:

Related Stories

No stories found.