एकमेकांचे उष्टं खाल्ल्याने प्रेम वाढते असे म्हणतात. अनेकदा आपल्या घरातही कुटुंबातील सदस्य एकाच ताटात खातात. पण तुम्हाला माहीत आहे का उष्टं खाल्ल्याने प्रेम तर वाढतेच पण अनेक आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. कोणाचं उष्टं खाऊ नका असा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. यामुळे आरोग्याला गंभीर हानी होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. चला जाणून घेऊया उष्टं खाण्याचे काय तोटे आहेत.
इंफेक्शनची भीती
जेव्हा आपण एकमेकांचे उष्टं अन्न खातो तेव्हा संसर्ग पसरण्याचा धोका असतो. जर तुम्ही कोणत्याही आजाराने बाधित व्यक्तीचे उष्टं अन्न खात असाल तर ते धोकादायक ठरू शकते. एका ताटात खाल्ल्याने सर्दी, फ्लू किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल यांसारखे संक्रमण सहज पसरू शकतात. म्हणूनच चुकूनही आजारी व्यक्तीसोबत एकाच ताटात अन्न खाऊ नये.
पचन समस्या
जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या ताटात अन्न खाता तेव्हा ते स्वच्छ आहे की नाही किंवा जेवण देणारी व्यक्ती किती स्वच्छतेने भांडी वापरत आहे हे तुम्हाला माहीत नसते. त्यामुळे अन्नामध्ये बॅक्टेरिया किंवा विषाणू येऊ शकतात. स्वच्छतेच्या अनुपस्थितीत, जंतू पोटात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो.
पोषक तत्वांची कमतरता
जेव्हा आपण दुसऱ्याच्या ताटात अन्न खातो तेव्हा शरीराला योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये मिळत नाहीत.
ऍलर्जीची समस्या
उष्टं अन्न खाल्ल्याने ऍलर्जी पसरू शकते. दुसऱ्याची प्लेट शेअर केल्याने क्रॉस कॅन्टिमिनेशन होऊ शकते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. तुम्ही आजारी देखील पडू शकता
उष्टं खाताना लक्ष द्या
1. जेवणापूर्वी हात चांगले धुवा
2. हाताने अन्न देऊ नका.
3. जर एखाद्याला कोणत्याही अन्नाची ऍलर्जी असेल तर त्याला त्याबद्दल सांगा.
4. उष्टं खाणं टाळा. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.