कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्या, आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

कोमट पाणी व तूप एकत्रित प्यायल्यास शरीरास कोणकोणते फायदे मिळू शकतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Hot Water With Ghee Benefits
Hot Water With Ghee Benefitssakal
Updated on

Hot Water With Ghee Benefits : तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य कित्येक फायदे मिळू शकतात. दुसरीकडे तूप खाल्ल्याने वजन वाढते, असा काहींचा समज असल्याने ही मंडळी आहारातून तूप पूर्णपणेच वर्ज्य करतात. काय राव! अवघडच आहे... तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व योग्य प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास शरीराचे वजन कमी होण्यास अन्य देखील लाभ आपल्या आरोग्यास मिळू शकतात. 

कोमट पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून प्यायल्यासही आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात. त्वचेपासून ते शरीराच्या पचनसंस्थेमध्येही सकारात्मक बदल पाहायला मिळतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Hot Water With Ghee Benefits
Weight Loss Tips दररोज सकाळी या बियांचे प्या पाणी, वजन घटेल व पचनप्रक्रियाही सुधारेल

बद्धकोष्ठता

आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा अभाव असल्यानं अन्नाचे पचन योग्यरित्या होत नाही. परिणामी काही जण बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे त्रस्त असतात. या समस्येपासून मुक्तता हवी असल्यास कोमट पाण्यामध्ये तूप मिक्स करून प्यावे. यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. 

Hot Water With Ghee Benefits
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा मसाज केल्यास मिळतील हे फायदे

त्वचा होते सुंदर

तुपामध्ये नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझरचे गुणधर्म असतात. यामुळे शरीर आतील बाजूने सुंदर होण्यास मदत मिळते. कोमट पाण्यामध्ये तूप मिक्स करून प्यायल्यास शरीराच्या आतील भागात असणाऱ्या आतड्या स्वच्छ होतात. शरीराच्या पचनसंस्थेचं कार्य सुरळीत सुरू राहते, त्यावेळेस शरीरात विषारी घटक जमा होत नाहीत.

Hot Water With Ghee Benefits
चेहऱ्यावर हवाय ग्लो? नियमित या 2 आसनांचा करा सराव

तुपामध्ये कॅल्शिअम, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा असतो. ज्यामुळे शरीरास नैसर्गिक स्वरुपात ओलावा मिळतो. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.

वजन नियंत्रणात राहते

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुपाचे सेवन केल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स आणि विषारी घटक शरीराबाहेर सहजरित्या फेकले जातात. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्यही निरोगी राहते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.