खाद्यपदार्थांची चव वाढावी, यासाठी बहुतांश जण कोकमचा वापर करतात. यामुळे स्वयंपाक अधिक स्वादिष्ट होतो. पण कोकम कोणत्या फळापासून तयार केले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? तर मित्रांनो हे फळ कोकण भागामध्ये आढळते. या फळाचे नाव आहे 'रतांबे'.
रतांबे हे फळ ‘गार्सिनिया इंडिका’ या नावानेही ओळखले जाते. हे फळ लाल किंवा गडद गुलाबी रंगाचे असते. यापासून तयार केल्या जाणाऱ्या कोकमचा कित्येक पदार्थांमध्ये समावेश केला जातो. कोकममुळे पदार्थांची चव वाढते शिवाय यातील औषधी गुणधर्म आरोग्यासाठीही पोषक आहेत.
पारंपरिक भारतीय औषधांमध्येही कोकमचा वापर केला जातो. विशेषतः कोकण भागामध्ये आढळणाऱ्या या फळामध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. चला तर जाणून घेऊया रतांब्यापासून तयार केल्या जाणाऱ्या कोकमचे सेवन केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात, याबाबतची सविस्तर माहिती.
कोकमचे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास शरीराच्या पचनप्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होतात. पोट फुगणे, पित्त, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्या कमी करण्यासाठी बहुतांश जण कोकम ज्युस पिण्याचा सल्ला देतात.
कोकममध्ये हायड्रॉक्सीसिट्रिक अॅसिड असते, ज्यामुळे शरीरातील अॅसडिटी कमी होण्यास व पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत मिळते.
शरीरातील रक्त शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास कोकममुळे मदत मिळू शकते. यामुळेच मधुमेहग्रस्तांना डाएटमध्ये कोकमचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
कोकममध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स गुणधर्माचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. ज्यामुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. तसंच पेशींमधील ऑक्सिडेटिव्ह तणाव देखील कमी होतो. हे घटक कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याचंही कार्य करतात. तसंच कोकम ज्युस प्यायल्यास त्वचेलाही खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
कोकमचा योग्य प्रमाणात आहारात वापर केल्यास वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते. तसंच शरीरातील अतिरिक्त चरबी देखील घटण्यास मदत मिळते. कोकममधील थर्मोजेनिक गुणधर्मामुळे शरीराचे वजन कमी होते, असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
संधिवात, सांधेदुखी, पित्त, छातीमध्ये जळजळ होणे यासारख्या समस्या कमी करण्यासाठी कोकम ज्युस पिण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. त्वचेशी संबंधित झालेली अॅलर्जीही कमी करण्यासाठी कोकम फायदेशीर मानले दाते.
रोगप्रतिकारक शक्ती होते मजबूत
कोकममध्ये व्हिटॅमिन सी यासारखे पोषणतत्त्व आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे विविध आजारांपासून शरीराचे संरक्षणही होण्यास मदत मिळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.