Health Care Tip : सौम्य तापाकडे करू नका दुर्लक्ष ; असू शकते गंभीर आजाराची सुरूवात

ऋतू बदलला की आजार पसरणार
Health Care Tip
Health Care Tipesakal
Updated on

ऋतू बदलला की आजार पसरणार हे गेली २ वर्ष आपण अनुभवले आहे. आता पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे हवेत गारवा जाणवू लागला आहे. या हवेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. खोकला, सर्दी आणि तापाचा हंगाम सुरू झाला असे गमतीने म्हटले जाते ते काही उगीच नाही.

Health Care Tip
Health Care Tips : ‘जेव्हा कडक भूक लागते, तेव्हाच खा’ ; वाचा आहार कसा असावा

औषध घेतले की आजार पळून जातात. त्यामुळे आजार कमी असताना औषध घेण्याचा सल्ला दिला जातो. औषध घेऊनही ताप उरतो त्यावेळी पुन्हा डॉक्टरकडे न जाता घरच्या घरी पॅरासिटामॉल घेऊन ताप कमी केला जातो. वरवर जाणवत नसला तरी शरीरात कणकण ताप राहतो. यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. औषध घेऊनही एक आठवड्यापेक्षा जास्त काळ तूम्हाला सौम्य ताप असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहीले पाहिजे.

Health Care Tip
Diabetes Health Care: झोप न झाल्यास वाढतं ब्लड शुगर; डायबिटीज रूग्णांनी एवढे तास घ्यावी झोप

सौम्य ताप कसा ओळखावा

सौम्य ताप म्हणजे शरीराचे तापमान 99 ते 101 पर्यंत राहते. यात ताप जास्तही होत नाही आणि कमीही. केवळ कमी प्रमाणात शरीर तापलेले जाणवते. यामुळे पाय दुखायला सुरूवात होते. दिवसभरात ताप येतो आणि गोळी खाल्ली की तात्पुरता आराम मिळतो. जर असेच 15 दिवस सतत असे होत राहीले तर त्याची तपासणी करावी. याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

Health Care Tip
Health Care: 'या' सात सवयी बनवतील तुम्हाला डायबिटीज पेशंट

व्हायरल इन्फेक्शन

सौम्य तापाचे कारण व्हायरल इन्फेक्शन असू शकते. हा काही गंभीर आजार नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. इन्फेक्शन काही दिवसांत संपते. त्यावर केवळ पॅरासिटामॉलने आराम मिळतो. यामध्ये तुम्हाला सर्दी, घसा खवखवणे, भरपूर शिंका येणे, भूक न लागणे अशी लक्षणे देखील दिसतात.

Health Care Tip
Hair Care Tips : जाहीरातीत पाहिलेले लोण्यासारखे केस खरच होतील?; हे कॉफी मास्क करतील मदत!

व्हायरल न्यूमोनिया

तूमच्या शरीरात मुरलेल्या सौम्य तापाचे गंभीर रूप म्हणजे न्यूमोनिया होय. आजारी व्यक्तीला तापासोबत थंडी वाजते. खोकलाही सुरू होतो. याचे प्रमाण इतके असते की, ३ आठवडे हा त्रास आपल्याला होऊ शकतो. यामध्ये रुग्णाला पूर्णवेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो.

Health Care Tip
Hair Care Tips : हे घरगुती उपाय वाढवतील केसांची चमक

युरीन इन्फेक्शन

युरीन इन्फेक्शन याचेही प्रमुख कारण हे ताप येणे असू शकते. या आजारात सतत ताप ये जा करत असतो. त्यासोबत थंडी जाणवते. इतर सामान्य लक्षणे म्हणजे लघवी करताना त्रास होतो. जळजळ आणि वारंवार लघवी होणे, असाही त्रास होतो.

Health Care Tip
Skin Care Tips : या ५ गोष्टी करा त्वचा राहिल फुलांप्रमाणे नाजूक

टीबी होणे

टीबी म्हणजे क्षयरोगाचे लक्षण असू शकते. यामध्ये सौम्य ताप तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतो. यामध्ये भूक न लागणे, खोकला, खोकल्यामधून रक्त येणे, वजन कमी होणे, रात्री घाम येणे यांचा समावेश होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()